मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमच्या पात्रता निकषामध्ये बदल करण्यात आल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने तिसऱ्या फेरीसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले होते. विद्यार्थ्यांना २३ जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत २८ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश शुल्क व आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर भरून ऑनलाईन नाेंदणी करता येणार आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पात्रता निकष ५० वरून १५ पर्सेंटाईल केल्यानंतर प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ऑनलाईन नोंदणीचे तिसऱ्या फेरीसाठीचे वेळापत्रक पुन्हा नव्याने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी २३ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत २८ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवेश शुल्क व आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळाच्या माध्यमातून भरता येणार आहेत.
also read
एमडी, एमएस, डीएनबी या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्याक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेमध्ये ५० पर्सेंटाईल मिळणे आवश्यक असते. मात्र अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी वैद्यकीय विज्ञानमधील राष्ट्रीय परीक्षा मंडळाने मागील आठवड्यामध्ये पदव्युत्तर प्रवेशाच्या पात्रता निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक असलेले पात्रता निकष १५ पर्सेंटाईलपर्यंत कमी केले. त्यामुळे नव्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये सामावून घेण्यासाठी तिसऱ्या फेरीचे वेळपत्रक नव्याने जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना नाेंदणी करणे शक्य न झाल्याने व प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अधिकाधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस मुदतवाढ दिली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
also read
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक ब्लॉक, वाहतूक अन्य मार्गाने वळवणार
सुधारित वेळपत्रकानुसार नव्याने पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी, प्रवेश शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे २८ जानेवारी रोजी रात्री ११.५९ पर्यंत संकेतस्थळावर भरता येणार आहे. तसेच २८ जानेवारी रोजी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील २ हजार ५१० जागांसाठी २९ नोव्हेंबरपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. २९ नोव्हेंबरला राज्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिली फेरी झाली. तर २४ डिसेंबरपासून दुसरी फेरी राबविण्यात आली. दोन फेऱ्यांमध्ये या अभ्यासक्रमासाठी १ हजार ६९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ८१६ जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागांवर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश होणार आहेत. आता ही प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.