मुंबई : वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पालिकेच्या वर्तुळात चांगलाच गाजला असून एका अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वर्सोवा येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणे, वरिष्ठांनी वारंवार सूचना करूनही अनधिकृत बांधकामे न पाडणे, बैठकांना हजर न राहणे, कार्यालयात न येणे अशा अनेक तक्रारींमुळे के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांचीही बदली करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या समक्ष बैठकीस उपस्थित राहण्याची सूचना दिल्यानंतरही शिंदे गैरहजर राहिल्यामुळे त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे.

अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमचा समावेश असलेल्या के पश्चिम विभागात २०२२ पासून कार्यरत असलेले दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्याकडे प्रभाग क्रमांक ५९, ६० आणि ६३ यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. प्रभाग क्रमांक ५९ आणि ६३ मध्ये अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरफार, मोकळ्या जमिनीवरील बांधकामे, विशेषतः वेसावे येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरात व दलदलीच्या जमिनीवर अनाधिकृत बांधकामांविषयी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. सहआयुक्त विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी सोमेश शिंदे यांना वारंवार सूचना केल्या होत्या. सोमेश यांना प्रत्यक्ष बोलावून संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र शिंदे यांनी या सगळ्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका : दोन्ही मार्गिकेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ, आता ‘इतकी’ दैनंदिन प्रवाशी संख्या

गेल्या आठवड्यात ३१ मेपासून वर्सोवा परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार होती. त्यात शिंदे यांनी कुचराई केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ५ जून रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी सोमेश शिंदे आणि पदनिर्देशित अधिकारी स्वप्निल कोळेकर यांना के पूर्व विभाग कार्यालयात बैठकीसाठी बोलावले होते. मात्र सोमेश शिंदे या बैठकीस गैरहजर राहिले आणि महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांचे त्यांनी उल्लंघन केले. त्यामुळे या प्रकरणाला एकूणच गंभीर वळण आले असून शिंदे यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, वेसावे येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीने विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

कारवाईच्या ठिकाणी वातानुकूलित गाडीत बसून राहिले

वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने के पश्चिम विभागाला दिले होते. ३ जून २०२४ रोजी कारवाई नियोजित होती. त्याबाबत निर्देश मिळाल्यानंतरही सोमेश शिंदे यांनी कारवाईसाठी कोणतीही तयारी केली नाही. एवढेच नव्हे तर ३ आणि ४ जून २०२४ रोजी प्रत्यक्ष निष्कासन कारवाई सुरू असताना सोमेश शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली. सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त व इतर सहकारी प्रत्यक्ष घटनास्थळी भर उन्हात उभे राहून दिवसभर कारवाई करीत असताना सोमेश शिंदे खासगी वाहनात वातानुकुलन यंत्रणा सुरू करून चक्क बसून राहिले. कारवाई पूर्ण होण्याआधीच ते निघून गेले. ही निष्कासन कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती व तोवर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका : दोन्ही मार्गिकेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ, आता ‘इतकी’ दैनंदिन प्रवाशी संख्या

अभियंत्याचा काळा इतिहास

सोमेश शिंदे यांच्याबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी आतापर्यंत पुढे आल्या आहेत. अनधिकृत गैरहजेरी, कार्यालयात अनुपस्थिती, इतर कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी नोंदवणे, बाहेर खासगी कार्यालय थाटल्याच्या तक्रारी, महानगरपालिका कार्यालयात नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही न करणे आणि एकूणच प्रशासकीय कामकाजात हेळसांड इत्यादी वेगवेगळ्या कारणांनी सोमेश शिंदे यांची चौकशी सुरू आहे. या सर्व प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन सोमेश शिंदे यांना प्रशासकीय कामकाजातील बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि त्यातून महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणे या कारणांसाठी खाते अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच आयुक्तांच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमेश शिंदे यांना मुंबई महानगरपालिका सेवा (वर्तणूक) नियम १९९९ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर उत्तर देण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. के पश्चिम विभागाचे पदनिर्देशित अधिकारी स्वप्निल कोळेकर यांचीही के पश्चिम विभागातून बदली करून त्यांना नगर अभियंता कार्यालयात परत पाठविण्यात आले आहे.