2024 Mumbai Vidhan Sabha Election Exit Poll Updates : राज्याच्या सत्तास्थापनेत मुंबईचा कौल नेहमीच निर्णायक ठरतो. मुंबईत यश मिळणारा पक्ष किंवा आघाडीचा राज्याच्या सत्तेचा मार्ग मोकळा होतो. यंदा मुंबईत अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचीही भिस्त मुंबईवर आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबईची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. दरम्यान,मुंबईत कोणाचा आवाज राहणार याबाबत एक्झिट पोलचे अंदाज आता समोर आले आहेत. जेवीसीच्या एक्झिट पोलनुसार कोणाला जास्त मते मिळणार हे पाहूयात.

मुंबईत विधानसभेचे ३६ मतदारसंघ आहेत. राज्याच्या सत्तास्थापनेत मुंबईतील आमदारांचे संख्याबळ महत्त्वाचे ठरते. १९७८ पासून निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईत सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष किंवा आघाडी-युती राज्याच्या सत्तेत आले आहेत. १९७८ मध्ये जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. तेव्हाच पुलोदचा प्रयोग करण्यात आला होता. १९८० व १९८५ मध्ये काँग्रेसला मुंबईत निर्विवाद यश मिळाले होते. १९९० मध्ये मुंबईत प्रथमच शिवसेना-भाजप युतीने काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढले. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीला सत्ता मिळाली तेव्हा मुंबईत युतीला एकतर्फी यश मिळाले होते. १९९९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले तरी मुंबईत शिवसेना-भाजपचे वर्चस्व होते. २००४ आणि २००९ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्ता मिळाली तेव्हा मुंबईने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला होता. २०१४ मध्ये स्वबळावर लढताना मुंबईत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि भाजपला राज्याची सत्ता मिळाली होती. गेल्या वेळी भाजप आणि शिवसेना युतीने मुंबई एकहाती जिंकली होती. अर्थात, भाजप आणि शिवसेनेचे मार्ग नंतर वेगळे झाले होते.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
vidhan sabha elections school holiday
राज्यात १८, १९ नोव्हेंबरला शाळांना सुटी नाही… काय आहे शिक्षण आयुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण?
whom will saved by Division of votes in Vikhroli constituency
विक्रोळी मतदारसंघामध्ये मतांचे विभाजन कोणाला तारणार
maaharashtra assembly election 2024 six retired officers are looking trying their luck in election
सहा निवृत्त अधिकाऱ्यांना आमदारकीचे वेध
Mumbai First Aditya Thackeray, Aditya Thackeray,
मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत, ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका
Pune People Representative, Pune Municipality,
नेता कोणाला म्हणायचे?
BJP active in search of rebel candidates in Belapur
बेलापूरमध्ये बंडोबांच्या शोधासाठी भाजप सक्रिय, वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग

मुंबईत कौल कोणाला?

जेवीएसच्या अंदाजानुसार, मुंबईत ३६ मतदारसंघात महायुतीला १७ ते १९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला १६ ते १८ जागा मिळतील. म्हणजे स्पष्ट बहुमत सध्या तरी इथे दिसत नाहीय. तर अपक्ष आणि इतर पक्षांना एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईत फक्त ५० टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांवर उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांमुळे मतदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडल्याचा अनुभव मतदारांना आला. मतदान केंद्रांवर सर्वसामान्य मतदार, अंपंग आणि वृद्धांसाठी विविध सोयी – सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत निरुत्साह दिसून आला. संध्याकाळपर्यंत जेमतेम ५० टक्के मतदान झाले होते. मतदारयादीत नाव नसणे, मतदान केंद्र बदललेले असणे असे अनुभवही मतदारांना आले. मात्र विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्यामुळे मतदान केंद्रांवर कुठेही रांगा दिसत नव्हत्या. मतदारांना घरातून बाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांची मात्र कसोटी लागत होती.