मुंबई : कफ परेड परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांच्या टोळीकडे सापडलेल्या दुर्मीळ मांडूळ प्रजातीच्या सापावर औषधांचा प्रयोग केला गेल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. मांडूळ प्रजातीच्या सापाची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती कफ परेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचला होता. संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली असता मागील बाजूस ठेवलेल्या एका पिशवीत तपासणी करताना त्यात पाच किलो वजनाचा आणि ५५ इंच लांबीचा मांडूळ साप आढळून आला.

दरम्यान, बचाव केलेल्या मांडूळ सापाला वैद्याकीय उपचारांसाठी वनविभागाच्या मदतीने ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’(रॉ) या स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. मांडूळ सापाला ताब्यात घेतले असता त्याच्या तोंडातून स्राव बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. तसेच सापाला हाताळताना त्याचे वजन अधिक असल्याचे जाणवले. त्यामुळे सापाची तातडीने वैद्याकीय तपासणी करण्यात आली. त्या वेळी सापाचे वजन पाच किलो भरले. या सापाचे वजन साधारण दीड ते दोन किलो इतके असते. शरीरातून स्राव बाहेर पडत असल्याने त्याच्या नेहमीच्या वजनापेक्षा त्याचे वजन अधिक भरले. याचा अर्थ त्याच्यावर औषधांचा प्रयोग करण्यात आल्याचा अंदाज आहे, असे तज्ज्ञांनी व्यक्त केला. यासाठी त्याच्या काही वैद्याकीय तपासण्या करण्यात आल्या. काही दिवसांतच अहवाल प्राप्त होईल, असे ‘रॉ’चे अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले.

Sanjay Verma appointed as Director General of Police of the state
रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलीस दल ‘या’ वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती!
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
BJP MLA Parag Shah is Maharashtra's Wealthiest Candidate from Ghatkopar East Constituency
‘५०० कोटींवरून पाच वर्षात थेट ३३०० कोटी’, सर्वात श्रीमंत उमेदवाराच्या संपत्तीचा तपशील वाचून डोळे गरगरतील
News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
In Mumbai Diwali 31 animals injured due to firecracker smoke
आतषबाजीत मुक्या प्राण्यांची फरपट, दिवाळीच्या चार दिवसांत ३१ प्राणी व पक्षी जखमी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा…आतषबाजीत मुक्या प्राण्यांची फरपट, दिवाळीच्या चार दिवसांत ३१ प्राणी व पक्षी जखमी

u

  • बदलत्या निसर्गचक्रात तुलनेने साप स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करतो, मात्र सापांच्या अनेक प्रजाती या अंधश्रद्धा, कर्मकांड यांचा बळी ठरल्या आहेत. त्यातील मांडूळ ही एक प्रजाती.
  • इतर सापांपेक्षा थोडी वेगळी शरीररचना असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. दुतोंड्या नावाने ओळखला जाणारा मांडूळ बिनविषारी आहे. झाडेझुडपे, पाणवठ्यांलगत ते दिसतात. त्याचे शरीर अजगरासारखे असते. पूर्ण वाढीनंतर तो ३ फुटांचा होतो.
  • मांडुळाला दोन तोंडे असतात, असा गैरसमज आहे. त्याची शेपटी आणि डोके सारखेच दिसते, त्यामुळे त्याला दुतोंड्या म्हणून ओळखले जाते. मांडूळ निशाचर असून निरुपद्रवी असतो. उंदीर, घुशी, सरडे, खारी हे त्याचे भक्ष्य आहेत.

Story img Loader