पावसाचा जोर कमी झाला असला तरी डासांवाटे फैलावणारा डेंग्यू व विषाणूंजन्य तापामुळे पालिका रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात वाढली आहे.  डेंग्यूमुळे गेल्या महिन्याभरात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यातच ऑगस्टच्या तुलनेत डेंग्यू रुग्णांची संख्याही दुप्पट झाली आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ८७ रुग्ण आढळले होते. सप्टेंबरचा अजून अर्धा महिना बाकी असताना ७६ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याची नोंद आहे. त्यातच सध्याच्या वातावरणात विषाणूंची वाढ वेगाने होत असल्याने डेंग्यूचा धोका अधिक आहे. ताप आणि विषमज्वराने आजारी असलेल्यांच्या संख्येतही विशेष घट झालेली नाही. सध्या सुरू असलेला पाऊस, दमट हवामान व बदलणारे तापमान यामुळे विषाणूंची वाढ व त्यामुळे तापाची साथ पुन्हा वाढण्याचीही शक्यता आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा