मुंबईतील वांद्रे येथील ‘ला मेर’ इमारतीच्या १३ व्या मजल्यावर आग लागली असून अग्निशमन दलाचे ४ बंब, पाण्याचे ४ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून या इमारतीमध्ये सचिन तेंडुलकर आणि ऐश्वर्या राय बच्चन यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचे फ्लॅट होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चजवळील उच्चभ्रू परिसरात ‘ला मेर’ ही इमारत असून या इमारतीमध्ये मुंबईतील दिग्गज मंडळीचे फ्लॅट आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा या इमारतीमध्ये फ्लॅट होता. तर ऐश्वर्या राय बच्चनचा या इमारतीमध्ये फ्लॅट आहे. विवाहापूर्वी तीदेखील याच इमारतीमध्ये राहत होती. या इमारतीच्या १३ व्या मजल्यावर मंगळवारी दुपारी आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या चार बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी चार टँकरही घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे समजते. याशिवाय रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली आहे. आगीत जीवितहानी झालेली नाही, असे अग्निशमन दलातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अभिषेक आणि ऐश्वर्या हे घटनास्थळी पोहोचले होते.