मुंबई : बोरिवली येथे २२ मजली इमारतीत गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आग विझवली. मात्र आगीच्या धुरामुळे गुदमरल्याने चार जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या दुर्घटनेत ७० वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला.

बोरिवली पूर्व परिसरातील मागाठाणे मेट्रो स्थानकासमोरील कनाकिया समर्पण टॉवरमध्ये ही आग लागली होती. शॉर्ट सर्कीटमुळे लागलेली आग २२ मजली इमारतीच्या पहिल्या ते सहाव्या मजल्यापर्यंतच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवनानांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने मदतकार्य हाती घेतले. जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात ही आग विझवली. मात्र आगीमुळे इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे चार जणांना श्वासोश्चवास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वृद्ध महेंद्र शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर अन्य तीन जणांची प्रकृती स्थिर आहे.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू

हेही वाचा…मुंबई : अक्सा किनाऱ्यावरील समुद्री पदपथ खचला, नागरिकांना प्रवेशबंदी

दरम्यान, मुंबईत दिवसभरात ९ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे आल्या. संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.