मुंबई : मुंबईमध्ये पहिल्यांदाच क्यूआर कोड चौक तयार करण्यात आला असून सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे नाव या चौकला देण्यात आले आहे. मुंबईतील हा पहिला क्यूआर कोड ग्रॅन्ट रोड येथील ह्युजेस मार्गावर तयार करण्यात आला आहे. क्यूआर कोडवरून सुधीर फडके यांची संपूर्ण माहिती पर्यटकांना वाचता येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मुंबई : पुनर्विकासाच्या नावाखाली दामोदर नाट्यगृह बंद करण्याचा घाट, सहकारी मनोरंजन मंडळाचा आरोप

हेही वाचा – मुंबई : वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला मोटारगाडीची धडक, हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

मुंबई शहरातील गावदेवी परिसरात असलेल्या ह्यूजेस मार्गावर गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा चौक उभारण्यात आला आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आमदार निधीतून या चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले असून चौकात कायमस्वरूपी क्यूआर कोड उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा स्थानिकांना एका शिलेमध्ये कोरलेला क्यूआर कोड स्कॅन करून सुधीर फडके यांच्या जीवनकार्याची माहिती काही क्षणात उपलब्ध होणार आहे. या चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके गीतरामायणाचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai first qr code chowk in grant road area sangeet ratna sudhir phadke chowk will be inaugurated by deputy cm today mumbai print news ssb