महालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये २२ ऑगस्ट रोजी एका छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी सिराज रेहमान खान ठाणे कारागृहातून गायब झाल्याच्या घटनेने आज (गुरूवार) खळबळ माजवली. परंतू, ठाणे तुरूंग अधिक्षक पवार यांनी सिराज तुरूंगातच असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. आमच्याकडे संरक्षक अधिका-यांची कमतरता असल्यामुळे आज आम्ही रेहमानला न्यायालयात सादर करू शकलो नाही. तसेच आमच्या वॉरंटद्वारे आम्ही ही बाब न्यायालपुढे मांडली होती, असंही पवार पुढे म्हणाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे १९ सप्टेंबर रोजी ६०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात ८६ साक्षीदार, १८ पंचनामे व २२ डीएनए चाचण्यांच्या अहवालाचा समावेश आहे.
२८ दिवसांत नराधमांवर आरोपपत्र दाखल
देशभर खळबळ माजवणा-या या सामूहिक बलात्कार प्रकरणी पाचही आरोपी अटकेत आहेत. सलीम अन्सारी, कासम बंगाली, विजय जाधव, सिराज रेहमान खान या चौघांसह एका अल्पवयीन आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण – आरोपी ठाणे तुरूंगातच; तुरूंग अधिक्षक पवार यांची माहिती
ठाणे तुरूंग अधिक्षक पवार यांनी सिराज तुरूंगातच असल्याचे 'लोकसत्ता'शी बोलताना स्पष्ट केले.
First published on: 26-09-2013 at 04:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai gangrape accused not missing he is in thane jail confirms