बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेता इरफान खान यांनी बलात्काराच्या घटनांसाठी बॉलीवूडला दोषी ठरवू नका असे म्हटले आहे. एका कार्यक्रमात बॉलीवूडमधील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. त्यावेळी अशा घटनांमध्ये चित्रपट आणि आयटम साँग कारणीभूत असल्याचे म्हणण्यात आले.
त्यावर करण जोहर म्हणाला की, अशा घटनांबाबत ऐकल्यावर सर्वप्रथम लाज वाटते. आम्ही चित्रपटांमध्ये मनोरंजनासोबत पारंपारिक मूल्यदेखील जपतो, मग आमची ही बाजू का पाहिली जात नाही? असेही करण म्हणाला.  
इरफान खान म्हणाला की, बलात्काराच्या घटनांमध्ये अधिकाधिक वाढ होत आहे कारण, अशा घटना उद्भवू नये म्हणून कोणतेच सक्षम पाऊल उचलले जात नाही आहे. ही एक गंभीर समस्या आहे. पण, यासाठी बॉलीवूड चित्रपटांना दोष देणे चूकीचे आहे.

Story img Loader