राज्य परिवहन विभागातील पाच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह २१ सहाय्यक प्रदेशिक परिवहन अधिकारी आणि १५ उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील तीनही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पश्चिम उपनगरचे अधिकारी अरूण भालचंद्र यांची परिवहन आयुक्त कार्यालयात बदली करण्यात आली असून मुंबई मध्यचे प्रादशिक परिवहन अधिकारी मधुकर जाधव यांची ठाणे येथे तर मुंबई पूर्व उपनगरचे अधिकारी विकास पांडकर यांची बदली धुळे येथे करण्यात आली आहे.
परिवहन विभागातील ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाल तीन वर्षांंपेक्षा जास्त काळ झाला आहे अशा अधिकाऱ्यांच्याच बदल्या करण्यात आल्याचे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पश्चिम उपनगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अरूण भालचंद्र यांना परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये उपायुक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
मधुकर जाधव यांच्या जागी धुळ्याचे प्रादशिक परिवहन अधिकारी के. टी. गोलानी यांची तर भालचंद्र यांच्या जागी नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. जी. भालेराव यांची बदली करण्यात आली आहे. पूर्व उपनगरचे प्रादशिक परिवहन अधिकारी पदी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. मुंबईतील डी. एन. मनवर (रत्नागिरी), एस. एस. मेश्राम (पेण), वाशीचे संजय राऊत (सातारा), ठाण्याचे एस. एस. वारे (जळगाव), कल्याणचे एस. सी. डोळे (ठाणे) या उप प्रादेशिक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांच्या जागी जळगावचे पी. डी. निकम यांची आयुक्त कार्यालयात, प्रदीप शिंदे (मुंबई पश्चिम), एस. पी. धायगुडे (वाशी), व्ही. आर. गुजराथी (कल्याण), ए. एम. हावरे (मुंबई मध्य) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर असलेल्या मुंबईतील वाय. के. बाग (पुणे), अर्चना गायकवाड (परिवहन आयुक्त कार्यालय), एस. जी. कातकडे (नंदूरबार), अनिल एस. पाटील (मुंबई मध्य), आर. जे. सरक (कल्याण) यांची बदली करण्यात आली असून मुंबईमध्ये ठाण्यातील एस. सी. बागडे (मुंबई पश्चिम), संजीव भोर (परिवहन आयुक्त कार्यालय) यांची बदली करण्यात आली आहे.
ठाण्याचे आर. एम. बेलसरे यांची नागपूर पूर्व, कल्याणचे अशोक पवार यांची ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.