मुंबई : गेल्या सहा-सात महिन्यांपासून गोरेगाव दिंडोशी भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून सोमवारी तेथील रहिवाशांनी पालिकेच्या प्रभाग कार्यालयावर मोर्चा नेला. या विभागातील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, पाणी नाही नळाला, महापालिका कशाला? अशा घोषणा देत रहिवाशांनी पालिका कार्यालयावर धडक दिली.

गोरेगाव दिंडोशीमधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा होतो आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून पाण्याच्या वेळा देखील निश्चित नाहीत. तसेच अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांचे आपापसात भांडण होते. पाणी आल्यानंतर ते अवघे दहा ते पंधरा मिनिटे असते. मिळणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त असून रहिवाशांनी सोमवारी आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली महापालिका पी पूर्व विभाग कार्यालयावर घागर मोर्चा काढला. त्यात बहुसंख्येने रहिवासी सहभागी झाले होते.

Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Massive fire breaks out in 13 floor building in Andheri Mumbai
अंधेरीत १३ मजली इमारतीला भीषण आग; आगीचे गांभीर्य वाढले
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल

हेही वाचा – आरोग्य विभागाच्या विशेष नवजात काळजी कक्षांमध्ये २ लाख ७७ हजार बालकांवर उपचार

पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, पाणी नाही नळाला, महापालिका कशाला? कोण म्हणतो देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाय, हाय हाय, महापालिका हाय हाय आदी घोषणांनी येथील परिसर दणाणून गेला. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रिकामे हंडे कळशा घेऊन टाळ्या वाजवत, घोषणा देत हा मोर्चा महापालिका पी उत्तर पूर्व कार्यालयावर सकाळी धडकला. आप्पा पाडा रिक्षा स्टँड येथून निघालेला हा मोर्चा रामलीला मैदान येथील पालिकेच्या कार्यालयावर नेण्यात आला होता.

दिंडोशी विधानसभा क्षेत्रात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत होता. मात्र त्यानंतर या विभागात अचानक पाणी येईनासे झाले आहे. गेले सहासात महिने दिंडोशी विभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली. पाण्याचा दाब कमी झाल्याचे कारण सांगितले जात आहे. जल अभियंता विभागाकडे माणसे नाहीत, कंत्राटदार नाहीत अशी कारणे अधिकारी सांगतात. मात्र त्यावर उपाययोजना करीत नाहीत. या विभागातील जीर्ण जलवाहिन्या बदलण्याची गरज असल्याचे मतही प्रभू यांनी व्यक्त केले. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर महापालिका विभाग कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले जाईल. कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्यास पोलीस प्रशासन, सरकार आणि महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा यावेळी प्रभू यांनी दिला.

हेही वाचा – सर्वच जुन्या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी संरचनात्मक सर्वेक्षण

पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आप्पा पाडा, क्रांतीनगर, प्रथमेश नगर, दुर्गा नगर, रामनगर, दुर्गा नगर टेकडी, तानाजी नगर, बाणडोंगरी, कोकणी पाडा, बासूवाला कंपाऊंड, पठाणवाडी परिसरात पाण्याचा दाब वाढवणे, दत्तवाडी, आनंदवाडी येथील नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत आहे. संतोष नगर, बीएमसी कॉलनी येथे ए वन स्वीट मार्ट येथे पाण्याची टाकी बांधावी, पाणी पुरवठ्यासाठी असलेले जुने पंप बदलून जास्त क्षमतेचे नवीन पंप बसवावे अशी मागणी यावेळी प्रभू यांनी केली.

Story img Loader