हार्बर मार्गावर रे रोड आणि डॉकयार्ड रोडदरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ऐन सोमवारी सकाळच्यावेळी या मार्गावरील लोकल वाहतूक कुर्लापासून मुख्य मार्गावरून वळविण्यात आली. यामुळे हार्बर मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.
सोमवारी सकाळी पावणे अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास हार्बरवरील या दोन स्थानकांदरम्यान सीएसटीकडे निघालेली लोकल तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे कुर्लापासून या मार्गावरील वाहतूक मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून वळविण्यात आली आहे.

Story img Loader