लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबईत ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने ओढ दिली आहे. तर धरणक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सातही धरणातील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरसरीच्या ७३ टक्के पाऊस पडला आहे.

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. मात्र तरीही धरणातील पाणीसाठा वाढतो का याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे. पाणीसाठ्यात अद्याप १५ ते १७ टक्के तूट आहे. पावसाचे दीड, दोन महिने शिल्लक असले तरी पाणीसाठ्यात तूट राहू नये याकरीता जलअभियंता विभागही धरणातील पाणी पातळीवर नजर ठेवून आहे.

आणखी वाचा-मुंबई: प्रत्येक मेट्रो रेल्वेसाठी आता स्वतंत्र देखरेख अधिकारी, एमएमआरडीएकडून अधिकारांचे विकेंद्रीकरण

मुंबई महानगरात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७३.७६ टक्के पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी यावेळी ७० टक्के पाऊस पडला होता. दरवर्षी मुंबईत अडीच हजार मिमी पाऊस पडतो. जूनपासून आतापर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर १७९२ मिमी पावासची नोंद झाली, तर सांताक्रूझ केंद्रावर २३५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणक्षेत्रात मात्र गेल्यावर्षीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अद्याप कमी आहे. सातही धरणात मिळून सध्या १२लाख ८हजार ६२४ दशलक्ष लिटर म्हणजेच ८३.५१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

आणखी वाचा- बढती मिळूनही पालिका अधिकारी जुन्याच पदावर

शहराला दररोज १,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठे भातसा धरण अजून काठोकाठ भरलेला नाही. २०२२ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भातसा धरणात ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा होता. मात्र यावेळी या धरणातील पाणीसाठा ७८ टक्के इतका आहे. त्यामुळे हे धरण ओसंडून वाहण्यासाठी अजून दीड लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या धरणात ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. पण १९ ऑगस्टपर्यंत ५ लाख ६० हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावातील पाणीसाठा ७१ टक्के आहे.

पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

१९ ऑगस्ट २०२३ …१२,०८,६२४ दशलक्ष लिटर ….८३.५१ टक्के

१९ ऑगस्ट २०२२…..१३,८८,५७४ दशलक्ष लिटर ….९५.९४ टक्के

१९ ऑगस्ट २०२१…….१२,१८,८८० दशलक्ष लिटर ….८४.२१ टक्के

मुंबईकरांची पाणी चिंता कायम, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मुंबईची पाणी चिंता काही प्रमाणात दूर झाली असली, तरी अद्याप पूर्णपणे मिटलेली नाही. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटलेली नाही, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबईकरांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे.

हेही वाचा : “उगाच जेलमध्ये महिनाभर खाऊन आणि…”; दीपाली सय्यद यांचा मनसे कार्यकर्त्यांना टोला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढला असला तरी पाणी चिंता कायम आहे. मुंबईची पाणी चिंता मिटल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर फिरत असल्यामुळे प्रशासनाने हि वस्तुस्थिती मांडली आहे. विहार तलाव १०० टक्के व तुळशी तलाव ९९ टक्के भरलेला आहे. मात्र, मुंबईच्या एकंदरीत पाणीपुरवठ्याचा विचार करता विहार व तुळशी तलावांमधील जलसाठा अत्यल्प आहे.

दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होते. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठ्याचा आढावा घेऊन पुढील पावसाळ्यापर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे, असे जल अभियंता खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रवीण पाटकर शिंदे गटात; आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

काही तांत्रिक कारणांमुळे व परिरक्षणाच्या आवश्यकतांमुळे धरणे पूर्णपणे भरलेले नसतानाही त्यांचे दरवाजे काही प्रमाणात उघडावे लागतात. यंदा पावसाळ्यात ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जलाशय’ अर्थात ‘मध्य वैतरणा’ तलावाचे दोन दरवाजे या आठवड्यात उघडण्यात आले होते. त्यातून विसर्ग झालेले पाणी त्याच नदी प्रवाहात खालच्या बाजूला असलेल्या मोडकसागर तलावात साठवण्यात आले. धरण भरल्यामुळे नव्हे, तर तांत्रिक कारणांमुळे पाणी सोडण्यात आले होते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.