कुख्यात गुंड छोटा राजन याचा खास हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया याच्या बनावट चकमकीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने बडतर्फ ‘चकमकफेम’ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील करणार की नाही याबाबत दोन आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले.
लखनभैया याचा वकील भाऊ रामप्रसाद गुप्ता यांनी शर्मा याला निर्दोष ठरविण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने या प्रकरणी सरकारनेही शर्मा याच्या विरोधात अपील केले आहे का, अशी विचारणा केली. त्यावर अद्याप तरी सरकारने अपील केले नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितल्यावर अपील करणार की नाही याबाबत दोन आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला
दिले. लखनभैया याचे अपहरण करून त्याची बनावट चकमक करण्यात आल्यावर शिक्कामोर्तब करून सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी आणि १२ पोलिसांसह एकूण २१ जणांना दोषी ठरविले होते व त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र त्याचवेळी शर्मा याच्याविरुद्ध पोलिसांना एकही थेट वा परिस्थितीजन्य पुरावा सादर करता आला नसल्याचे स्पष्ट करीत त्याची निर्दोष सुटका केली होती. परंतु शर्मा हाच या बनावट चकमकीतील मुख्य सूत्रधार असल्याचा आणि त्याच्याविरुद्ध पुरेसा पुरावा असल्याचा दावा करीत अॅड्. गुप्ता यांनी शर्मा याच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात अपील केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2013 रोजी प्रकाशित
निर्दोष प्रदीप शर्माविरुद्ध अपील करणार का?
कुख्यात गुंड छोटा राजन याचा खास हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया याच्या बनावट चकमकीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने बडतर्फ ‘चकमकफेम’ पोलीस ...
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-08-2013 at 03:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai hc asks if govt is going to appeal against pradeep sharmas acquittal