मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी ३५ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्मा सोसावा लागला. मात्र बहुसंख्य मतदारांनी उन्हाचा तडाखा सोसत मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या आठ जणांना उन्हाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांवर नेण्यात आले. तेथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
उन्हाचा वाढता तडाखा आणि मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, पंखे आदी सुविधांचा अभाव यामुळे मतदारांचे अतोनात हाल झाले.
हेही वाचा…मुंबई : धारावीतील रंगीबेरंगी मतदान केंद्र ठरले लक्षवेधी
त्यामुळे मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या आठ जणांना चक्कर येणे, निर्जलीकरण होणे असा त्रास झाला. त्यांना तातडीने मतदान केंद्राजवळ असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांत नेण्यात आले. आरोग्य केंद्रामध्ये उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.