मुंबई : महिला प्रवाशाच्या हातातील पिशवी हिसकावून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सच्या सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्ध सुरू केलेली फौजदारी कारवाई उच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ चा विचार केल्यास, कोणत्याही महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळाचा वापर करण्याचा संबंधित व्यक्तीचा हेतू असणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकरणात याचिकाकर्त्याचा असा कोणताही हेतू होता, हे आढळून येत नाही. त्यामुळे, पुराव्यांवरून याचिकाकर्त्याविरोधात सकृतदर्शनी फौजदारी कारवाई केली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने नोंदवले.

हेही वाचा : वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळण्याचे प्रकरण; खटला संथगतीने सुरू असल्याने आरोपीला जामीन

तक्रारदार महिला आणि तिचा पती १२ जानेवारी २०१६ रोजी कोचीहून अहमदाबादमार्गे मुंबईला येत होते. दुपारी विमान मुंबईत दाखल झाले. त्यावेळी, तक्रारदार महिलेच्या पतीला विमानातील शौचालयाचा वापर करायचा होता. यावेळी हा विनयभंगाचा प्रकार घडला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court cancel criminal action against indigo airlines security manager in molestation case mumbai print news css