मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला धक्का देणारा निर्णय देत दिला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाला परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवतिर्थावरुन उद्धव ठाकरेंचाचा आवाज घुमणार हे स्पष्ट झालं आहे. याच निर्णयाबद्दल बोलताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा दसरा मेळावा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होईल असं म्हटलं आहे. मात्र याचवेळी अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला न्यायालयाची परवानगी : शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “असा निर्णय न्यायालयाने…”

यंदाचा दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा केला जाणार आहे, असं सुषमा अंधारे यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे. तसेच, “दसरा मेळाव्यातील भाषण हे अनेकांच्या जिव्हारी लागणारं असेल. महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचा दरारा कायम असेल, याचं समाधान आहे,” असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.

तसेच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या वादामध्ये बाळासाहेबांच्या नावाचा वापर केला जातोय यासंदर्भातही पत्रकारांनी अंधारे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला. “बाळासाहेबांचा शिवसैनिक खिळाडू वृत्तीने राहतो, महिलांचा आदार करतो. रामदास कदमांसारखी विधान करत नाही. खरा शिवसैनिक सुरतला पळून जाऊ शकत नाही. खरी शिवसेना कुणाची हा विचार कोणाचा हे जनता जाणून आहे,” असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader