मुंबई :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाप्रकरणी लष्कराच्या माजी लेफ्टनंट कर्नलला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याचा कोर्ट मार्शलचा आदेश रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. सशस्त्र दल न्यायाधिकरणाने (एएफटी) जानेवारी २०२१ मध्ये जनरल कोर्ट मार्शलद्वारे याचिकाकर्त्याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवून पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या आदेशाला याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याबाबतचा कोर्ट मार्शलने दिलेले निर्णय योग्य ठरवून त्याची फेटाळून लावली. आपण कोणत्याही वाईट हेतूने मुलीला स्पर्श केला नव्हता. आपला स्पर्श हा आजोबा किंवा पित्याप्रमाणे होता. त्याच नात्याने आपण मुलीकडे चुंबन मागितले होते, असा दावा याचिकाकर्त्याने शिक्षेचा निर्णय रद्द करण्याची मागणी करताना केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तथापि, पीडित मुलीने आरोपीचा वाईट स्पर्श ओळखला होता यावर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच, तिने कोर्ट मार्शलसमोर साक्ष नोंदवताना आरोपीने तिला कोणत्याही वाईट हेतूने स्पर्श केला नव्हता आणि तो स्पर्श पालक किंवा आजोबांच्या स्पर्शासारखा होता हा याचिकाकर्त्याचा दावा फेटाळून लावल्याकडे न्यायालयाने निर्णय देताना लक्ष वेधले. पीडित मुलगी पहिल्यांदाच आरोपीला भेटली होती. त्यामुळे. तिच्या मांडीला स्पर्श करून व तिचे चुंबन घेण्याच्या बहाण्यानेच आरोपीने तिचा हात धरल्याचे स्पष्ट होते, असेही न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले. मुलीला अर्जदाराचा वाईट स्पर्श जाणवला आणि तिने ताबडतोब तिच्या वडिलांना त्याबाबत सांगितले. तसेच कोर्ट मार्शलने या प्रकरणी याचिकाकर्त्याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवताना नोंदवलेल्या निष्कर्षांमध्ये कोणतीही त्रुटी आढळून आली नाही. असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, याचिकाकर्त्याच्या मूलभूत अधिकारांचे कोणतेही उल्लंघन झाल्याचे कोर्ट मार्शल कारवाईवरून आढळून येत नसल्याचेही न्यायालयाने आदेशात प्रामुख्याने नमूद केले.

पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचे वडील लष्करात हवालदार म्हणून कार्यरत होते. फेब्रुवारी २०२० मध्ये वडिलांच्या सांगण्यावरून धाकट्या भावासह ती आरोपीला भेटण्यास गेली होती. त्यावेळी, आरोपीने त्यांना त्याच्या खोलीत नेले. त्यावेळी, आरोपीने पीडितेच्या मांडीला स्पर्श केला आणि तिच्याकडे चुंबन मागितले. मुलीने ताबडतोब तिच्या वडिलांना आरोपीने तिच्यासह केलेला हा प्रकार वडिलांना सांगितले. त्यानंतर, पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.