मुंबई लोकल रेल्वेप्रमाणेच बेस्ट उपक्रमाची बससेवा हीदेखील मुंबईकरांची जीवनवाहिनीच. कदाचित कांकणभर अधिक महत्त्व या बससेवेला आहे. कारण ती मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचते. ५०-६० दशकेच नव्हे तर तब्बल १५० वर्षे ही सेवा अविरत सुरू आहे. या सेवेनेही अनेक बदल पाहिले. मुंबईकरांच्या प्रवासाच्या बदललेल्या गरजा पाहिल्या आणि त्यानुसार स्वतःच्या सेवेतही अनेक बदल केले.

अनेकदा नेहमीच्याच असलेल्या गोष्टींकडे आपण फारशा गांभीर्याने पाहात नाही. पण हा हा म्हणता या बससेवेने आता तब्बल शतकोत्तर सुवर्णमहोत्सवात प्रवेश केला आहे. अशा प्रकारची ही देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील अनोखी सेवा आहे.

humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
an uncle dance so gracefully in sambhaji nagar bus stop
“टेन्शन विसरायला शिका!” संभाजीनगरच्या बसस्टॉपवर काकांनी केला बिनधास्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
dsp meets vegetable vendor friend in bhopal
१४ वर्षांनंतर डीएसपींनी भाजीवाल्या मित्राला शोधून काढलं, गाडीतून उतरले आणि गळाभेट घेतली; भावनिक Video व्हायरल!
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?

एखादा नवीन प्रकल्प आला की, त्याला विरोध होणे हा आपला नित्याचाच अनुभव आहे. असाच अनुभव या बेस्टलाही आला. तब्बल १५० वर्षांपूर्वी जेव्हा ट्रामसेवा सुरू झाली, त्याही वेळेस त्या ट्राम सेवेला याच मुंबईत विरोध झाला. हा विरोध कशासाठी झाला आणि या ट्रामसेवेने नंतर कोणती रूपांतरे घडवून आणली, मुंबईच्या प्रगतीत तिचे योगदान काय हे सारे जाणून घेण्यासाठी ‘गोष्ट मुंबईची’चा हा भाग पाहायलाच हवा.