Mumbai Hit and Run: पुण्यातील पोर्श आणि वरळीमधील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईच्या गोरेगाव येथील आरे कॉलनीत पुन्हा एकदा हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी (२९ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन चालकाच्या SUV गाडीने २४ वर्षीय दुचाकीस्वारास धडक दिली. या अपघातात २४ वर्षीय नवीन वैष्णव या तरुणाचा मृत्यू झाला. पहाटे दूध पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या तरुणाला हिट अँड रनमुळे नाहक जीव गमवावा लागला आहे. यावेळी अल्पवयीन चालक हा नशेत होता, असा आरोप मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या स्कॉर्पियो वाहनाची पुढे जाऊन विजेच्या खांबाला धडक बसली. त्यामुळे वाहनात बसलेले चार जण किरकोळ जखमी झाले. अल्पवयीन चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर अल्पवयीन चालकासह दोघे जण आणि वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
rape and murder of 2 minor sisters in Pune
Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
Contractor fined Rs 1.5 lakh for poor road work in Andheri
अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड
pune incident of speeding car hitting couple on two wheeler on flyover in Gultekdi
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
In Chembur young food delivery man beaten and robbed of his phone
खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या तरुणाला मारहाण करून लूटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे नवीन वैष्णव दूध डिलिव्हरी करण्यासाठी बाहेर पडला होता. आरे कॉलनीतून जात असताना समोरून चुकीच्या दिशेने स्कॉर्पियो गाडी भरधाव वेगाने आली आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातात नवीन वैष्णवचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत नवीनला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन चालक, स्कॉर्पियो गाडीचा मालक इकबाल जीवानी (४८) आणि मोहम्मद फज इकबाल जीवानी (२१) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघात स्थळी असलेले सीसीटीव्ही चित्रण हाती घेतल्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त गाडीही जप्त केली. अल्पवयीन चालकाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अपघात घडला तेव्हा चालक नशेच्या अमलाखाली होता का? याचा तपास केला जाणार आहे.

Story img Loader