Mumbai Hit and Run Case : मुंबई हिट अँन्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याने मद्यप्राशन केलं होतं असं मुंबई पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मुंबई पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

“वरळी अपघातानंतर (Hit and Run Case) मी आणि कुटुंबीय घाबरलो होतो. त्यामुळे मी पळालो. अपघातावेळी मी मोटरगाडी चालवत होतो, पण मी मद्यपान केले नव्हते, असा दावा आरोपी मिहीर शहाने पोलीस चौकशीत केला होता. परंतु, मुंबई पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने मद्यप्राशन केले होते, हे सिद्ध झालं आहे. एवढंच नव्हे तर त्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन केलं होतं, असंही मुंबई पोलीस म्हणाले आहेत.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हेही वाचा >> Hit and Run Case : गाडी चालवत होतो, पण मद्यप्राशन केले नव्हते; वरळी अपघात प्रकरणातील आरोपी मिहीरचा चौकशीत दावा

Hit And Run प्रकरणात मुंबई पोलीस काय म्हणाले?

“वरळी हिट अँन्ड रन प्रकरणातील (Hit and Run) अटकेत असलेला मिहीर शाह याने घटनेपूर्वी दारूचे सेवन केले होते. घटनेच्या रात्री त्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारू प्राशन केली. गिरगाव चौपाटीजवळ कार चालवण्यासाठी मिहिरने ड्रायव्हरकडून जबरदस्तीने कारची चावी घेतली होती”, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

जुहू आणि बोरीवली-मालाड येथे मद्यप्राशन

“मिहीर शाहने प्रचंड दारू प्यायली होती. जुहूच्या बारमध्ये त्याने मद्यप्राशन केलं होतं. त्यानंतर त्याने पुन्हा बोरीवली ते मालाडदरम्यानच्या एका बारमध्ये मद्यप्राशन केलं. दोनवेळा दारू प्यायल्यानंतर त्याने ड्रायव्हरकडे गाडी चालवण्याकरता चावी मागितली”, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिले आहे.

मरीन ड्राईव्हवर त्याने गाडी चालवण्याचा आस्वाद घेतला. दरम्यान, घटना घडली त्या ठिकाणी चालक आणि मिहीरला पोलिसांनी नेलं होतं.तिथे घटनेचा सीन रिक्रिएट करण्यात आला. चालक आणि मिहीरने दिलेल्या स्टेटमेंटवर पोलिसांचा पूर्णपणे विश्वास नसल्याचंही इंडिया टुडेने म्हटलं आहे.

मिहीर शाहला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अपघातानंतर कुटुंबावर हल्ला होईल या भीतीने आम्ही घर सोडले, असे मिहीरने चौकशीदरम्यान सांगितले आहे. अपघातानंतर मिहीरचे पालघरमधील आजी-आजोबाही घर सोडून गेले होते. तेथे वरळी पोलिसांचे पथक पोहोचले त्यावेळी मिहीरचे आजी-आजोबा दोन दिवसांपासून बाहेर गेल्याचे पोलिसांना समजले. मिहीर याच्या मोटरगाडीची क्रमांक पाटी (नंबरप्लेट) कोणी हटवली याबाबत पोलीस तपास करत आहेत. याशिवाय आरोपी मिहिरने आपल्याकडे चालक परवाना असल्याचे सांगितले आहे. पण अद्याप कुटुंबियांनी त्याचा चालक परवाना पोलिसांना दिला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांची चौकशी करण्यात आली आहे.