(स्रोत – मुंबई पोलीस वेबसाइट)
एटीएम कार्डाचे क्लोनिंग करुन मुंबईत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. पण सायबर गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे आणि त्यात वाढ होत आहे. हॅकिंग करणे, ऑनलाईन फसवणूक करणे आदी विविध सायबर गुन्हे विविध ठिकाणी नोंदविले जात आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सायबर गुन्ह्यातदेशभर वाढ होत असून एकटय़ा मुंबईत गेल्या एकाच वर्षांत अशा गुन्ह्य़ांमध्ये तब्बल २१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील सायबर गुन्ह्यांमध्येही ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विविध गुन्ह्यात अग्रेसर असलेल्या राजधानी दिल्लीमध्येही सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. भारतात ऑनलाईन फसवणुक, हॅकींग, सायबर गुन्हे आदींचे ८ हजार ३२२ गुन्हे दाखल करण्यात आले. तब्बल ५२ कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कशी होते फसवणूक?
हल्ली क्रेडिट कार्डाद्वारे खरेदी करणाऱ्यांचा लोकांचा कल दिसतो. क्रेडिट कार्ड ज्या मशीनमधून स्वाईप केले जाते, त्या मशीनवर स्कीमर बसविला तर हॅकर्सला संपूर्ण तपशील मिळतो. मग तो रद्द केलेली क्रेडिट कार्डे वा अगदी बडय़ा हॉटेलच्या इलेक्ट्रॉनिक कीचा वापर करूनही बनावट कार्ड तयार करू शकतो. एटीएम सेंटरमधील तपशील गोळा करण्यासाठीही हॅकर्स डेटा रीडर मशीन लीलया बसवितात. एटीमची तपासणी करण्यासाठी आलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत काहीही कल्पना नसेल, असे बिल्कूल वाटत नाही.

व्याप्ती मोठी
हॅकिंग करणे, ऑनलाईन फसवणूक आदी सायबर गुन्हे विविध ठिकाणी नोंदविले जात आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद होणारे मुंबई हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ मध्ये असे ३३ गुन्हे, तर २०१२ मध्ये १०५ गुन्हे नोंदविले गेले. सायबर गुन्हयांमध्ये मुंबईत हॅॅकिंगचे २० तर इंटरनेटवर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्याते ७६ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय न नोंदले गेलेल्या गुन्ह्य़ांची संख्याही बऱ्यापैकी असल्याचे सांगितले जाते.

काही गाजलेले सायबर गुन्हे
मुलुंडमधील बॅंकेतून १ कोटी  गायब
३१ जानेवारी रोजी अंकुर कोरानी या उद्योगपतीच्या फायबिल इंडिया लिमिटडे या कंपनीच्या मुलुंड येथील येस बॅंकेच्या अकाऊंट मधून एक कोटी रुपये रातोरात गायब झाले आणि मोठी खळबळ उडाली. इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरिंगद्वारे हे पैस विविध १२ खात्यांत वळविण्यात आले होते. वसईतील ट्रॉय परेरा याच्या खात्यात ३० लाख रुपये जमा झाले होते. पोलिसांनी त्याला अटक केली आणि या प्रकरणाचा उलगडा होत गेला. दिल्लीतील फजलूर रेहमान (२७) आणि त्याचा भाऊ शाहरुख रेहमान (२३) हे दोघे या घोटाळ्याचे सूत्रधार होते.

लॉटरीच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक
तुम्हाला पाच कोटींचे बक्षिस लागले आहे, अशा आशयाचे मेसेजेस गेल्या वर्षी अनेकांच्या मोबाईलवर आले. त्याला शेकडो लोक बळी पडले आणि लाखो रुपयाना फसले. जून २०१२ मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी गोरेगाव येथून ६ नायजेरियन तरुणांना अटक केली. परदेशातील एक इसम मरण पावला असून त्यांना कुणी वारस नाही. त्यांची कोटय़ावधी रुपयांची संपत्ती देण्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे, असे सांगणारा मेसेज पाठवूनही या टोळीने लोकांची फसवणूक केली आहे.

जगभर तेच..
जगभरातच सायबरगुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. संपुर्ण जगात सायबर गुन्ह्यात ४२ टक्कयांनी वाढ झाली असून भारतात ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे कॅलिफोर्निया येथून प्रकाशित होणाऱ्या इंटरनेट सिक्युरिटी या साप्ताहिकात म्हटले आहे.

कोणती काळजी घ्याल?
क्रेडिट/डेबिट कार्ड
कार्डाच्या दोन्ही बाजुच्या झेरॉक्स प्रती कोणालाही देऊ नका. कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू हा क्रमांक मागील बाजूस असतो. त्यामुळे कार्डाचा गैरवापर सहज करता येतो. कोणालाही फोनवर कार्डाचा तपशील देऊ नका. ऑनलाईन व्यवहार करताना संकेतस्थळाची अधिकृतता तपासा. क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट दर महिन्याला न मिळाल्यास बँकेला कळवा.

एटीएम मशीनमध्ये स्कीमर
स्कीमर पुढील ठिकाणी असू शकतो १. स्क्रीनवरील लाईट डिफ्युझर एरिया २. स्पीकर एरिया, ३. कीबोर्ड ४.एटीएम कार्ड स्वाईप करण्याचे ठिकाण. ५. एटीएम मशीनच्या साईडला. काही तासांपुरताच स्कीमर लावला जातो. प्रामुख्याने मध्यरात्री, पहाटे वा दुपारच्या वेळी.

महाराष्ट्रही अग्रेसर
राज्यातल्या सायबर गुन्ह्यातही ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१२ या वर्षांत राज्यात ५६१ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले. त्यापैकी ४७१ गुन्हे हे आयटी अ‍ॅक्टनुसार नोंदविले गेले होते.
महाराष्ट्र    –     ५६१
आंध्रप्रदेश    –    ४५४
कर्नाटक    –     ४३७

स्कीमर कसे ओळखाल
एटीएममशीनवर नीट लक्ष ठेवा. ज्या ठिकाणी स्कीमर असेल तेथून हलकासा प्रकाश बाहेर येणे, एटीएम मशीनमध्ये कुणीतरी लावलेली चिकटपट्टी वा की बोर्ड वा स्वाईप करण्याच्या ठिकाणी खोडसाळपणा.

वेबसाईट, ईमेल
अनोळखी वेबसाईट, ईमेल उघडू नका. कुठल्याही बडय़ा कंपनीच्या नावे ईमेल असेल तरी त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन खात्री करून घ्या. मेलवर कोणालाही आपला तपशील कळवू नका. अनोळखी व्यक्तीशी चॅटींग करू नका.