एका इंग्रजी नियतकालिकात प्रशिक्षणार्थी छायाचित्रकार म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी लोअर परळ येथील शक्ती मिल कंपाऊंड भागात घडली. याचा भारतीय जनता पक्षाचे(भाजप) प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र निषेध व्यक्त करत, राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले की, “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईला ‘सेफ सिटी’ बनविण्याचे आश्वासन, आर.आर.पाटील यांनी दिले होते. मात्र, मुंबई ‘रेप सिटी’ होत आहे”. त्यामुळे तुम्ही जर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नसाल, तर तुम्ही पदावरून पायऊतार व्हायला हवे असेही फडणवीस म्हणाले.
एकटय़ाने प्रवास करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना ताज्या असतानाच भर सायंकाळी घडलेल्या या घटनेने मुंबई महिलांसाठी असुरक्षित असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा