मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) बेकायदा बांधकामांबाबत संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे म्हटले आहे. तसेच लोकांना मरण्यासाठी सोडून द्यावे अशी महाराष्ट्र सरकारची धोरणे नसावीत असे हायकोर्टाने म्हटले. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन धोरणांचा उल्लेख केला. ज्यामध्ये १ जानेवारी २००० पूर्वी तयार झालेल्या आणि १४ फूटांपेक्षा जास्त उंच नसणाऱ्या झोपडपट्ट्यांना जमीनदोस्त करण्यापासून वैधानिक संरक्षण दिले जाते. मालवणी येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी सुनावणी सुरु असताना न्यायालयाने याबाबत भाष्य केलं आहे.

९ जून रोजी मालवणीतील निवासी इमारत कोसळणे हा अति लालचीपणाचा एक परिणाम असल्याचे खंडपीठाने नमूद केले आणि गरिबांच्या घरांसाठी “सिंगापूर मॉडेल” पासून राज्य अधिकाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, अशी सूचना केली. “फक्त मुंबईतच शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले जाते आणि त्या बदल्यात त्यांना मोफत घरे दिली जातात. मी मुख्य न्यायाधीशांना (जे पूर्वी कोलकाता हायकोर्ट येथे होते) यांना पश्चिम बंगालमध्ये असे धोरण अस्तित्त्वात आहे का असे विचारले असता त्याचे उत्तर नाही हे होते,” असे न्यायमूर्ती कुलकर्णी म्हणाले.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी

गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर खंडपीठ स्वत: दाखल केलेल्या याचिकेसोबत इतर जनहित याचिकांच्या अध्यक्षपदी होते. गेल्या महिन्यात मुंबईच्या मालवणी भागात इमारत कोसळल्यानंतर हायकोर्टाने पुन्हा एकदा याचिका सुनावणी सुरू केली होती. त्यात आठ मुलांसह १२ जणांचा मृत्यू झाला होता.

मालवणीमध्ये इमारत कोसळून १२ मृत्युमुखी

मालवणी घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते आणि प्राथमिक अहवालात कोसळलेली निवासी इमारत सुरुवातीला फक्त ग्राउंड प्लस वन रचना असल्याचे म्हटले होते. त्यामध्ये अतिरिक्त मजले बेकायदेशीरपणे उभारले गेले होते आणि त्यामुळे मूळ संरचनेचेबद्दल माहिती मिळाली नाही, असे अहवालात म्हटले आहे.

सोमवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील अस्पी चिनॉय यांनी हायकोर्टाला सांगितले की शहरातील शहरातील अधिसूचित झोपडपट्टी भागात बहुतेक सदनिकांमध्ये बेकायदेशीरपणे अतिरिक्त मजले जोडण्यात आले आहेत. झोपडपट्टी ही एक समस्या आहे परंतु शहरातील कामासाठी देखील आवश्यक आहे. अधिसूचित झोपडपट्टी भागात जरी तळमजला एक मजल्याची परवानगी दिली गेली तरी घरे कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी पुढील मजले बनवण्यापासून थांबण्याची गरज आहे,” असे चिनॉय म्हणाले.

शहरातील काम करणाऱ्या लोकसंख्येला झोपडपट्टीत राहण्याची गरज नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. गरीबांसाठी घरे बांधण्यासाठी राज्य “सिंगापूर मॉडेल” पासून प्रेरणा घेऊ शकते. “परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पण आमच्याकडे अशी धोरणे असू शकत नाहीत ज्यातून लोकांना मरण्यासाठी सोडून द्यावे लागेल. आपल्याला मानवी जीवनाला महत्त्व द्यावे लागेल,” असे हायकोर्टाने म्हटले आहे. “लोक म्हणतात की त्यांच्याकडे इतर कोठे राहण्याची जागा नाही आहे म्हणूनच त्यांना आपला जीव धोक्यात घालण्याची आणि बेकायदेशीर घरांमध्ये राहण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.” असेही कोर्टाने म्हटले.

मालवणी दुर्घटनेला पालिकाच जबाबदार

एमएमआरसाठी अस्तित्त्वात असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन तरतुदीनुसार १ जानेवारी २००० पर्यंत बांधलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक कायदेशीररित्या संरक्षित आहेत आणि मोफत पुनर्वसन सदनिकांमधून त्यांना काढता येणार नाही.

सध्याच्या प्रकरणात (मालवणी) जागेचे वाटप कोणाला करण्यात आले हे दाखवण्यासाठी कोणतेही कागदपत्र नाही. तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. हा निव्वळ लालचीपणा आहे, असे हायकोर्टाने सांगितले. “ज्याला जागेचे वाटप केलं आहे तो सरकारी जमिनीचे अतिक्रमण करणारा आहे, ज्यांना तळमजला फुकटात मिळाला. नंतर त्याने आणखी मजले बांधले आणि जास्त लोभापोटी घरे भाड्याने दिली,” असे त्यात म्हटले आहे. उच्च न्यायालय मंगळवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.