मुंबईतील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनागोंदी आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन गुरुवारी दुपारी २ ते ४ यावेळात आझाद मैदानात होईल.
संघटनेकडे या कार्यालयातील गैर कारभाराबाबत सातत्याने तक्रारी येत असून याची दखल घेऊन हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. सेवानिवृत्त शिक्षकांना वेळेवर निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी न मिळणे, शिक्षण सेवक कालावधी संपल्यावर शिक्षकांना वेतन श्रेणीवर घेताना लवकर मान्यता न देणे अशा तक्रारी वारंवार संघटनेकडे येत आत्या. याबाबत उपसंचालकांना भेटून कारभारात सुधारणा करण्याचे निवेदन वारंवार देऊनही काहीही सुधारण न झाल्याने अखेर संघटनेने आंदोलनाचा पवित्रा अवलंबविला आहे. तातडीने उपसंचालकांची बदली करून चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करून पीडीत शिक्षकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Story img Loader