मुंबई : ‘नेटफ्लिक्स’वर प्रसारित करण्यात आलेल्या ‘सिकंदर का मुकद्दर’ या चित्रपटात फ्लेमिंगोंचे ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण केल्याची तक्रार पक्षीप्रेमींनी केली होती. दरम्यान, या तक्रारीची कांदळवन कक्षाने दखल घेतली असून, याप्रकरणी तपासणीला सुरुवात केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

‘सिकंदर का मुकद्दर’ या चित्रपटात ड्रोन कॅमेरा फ्लेमिंगोच्या अगदी जवळ नेऊन चित्रीकरण करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत पर्यावरणप्रेमी, तसेच पक्षीप्रेमींनी कांदळवन कक्ष आणि महाराष्ट मुख्य वन नियंत्रक यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत कांदळवन कक्षाने तपासणीला सुरुवात केल्याची माहिती कांदळवन कक्षाने दिली. तपासणीदरम्यान पुरावे हाती सापडताच तात्काळ कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Mahakumbh mela 2025 Drone Show fact check video
महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळेल डोळे दिपवणारा भव्य ‘ड्रोन शो’? व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ नेमका कुठला? सत्य जाणून तुम्हीही व्हाल हैराण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Drones will monitor illegal fishing and boat entry in Thane and Palghars bay
अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर
Flamingos and Other Migratory Birds Flock to Ujani Dam
भादलवाडीत चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग
fisheries department monitor Konkan coast through drones to prevent intrusion of foreign fishing boats
कोकण किनारपट्टीतील समुद्रावर आता ड्रोनची नजर, परप्रांतिय घुसखोरी आणि एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाचा उपाय
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Marathi actress alka kubal said about behind story of these photos
अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या, “जेव्हा विमान थांबलं…”
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब

हेही वाचा – आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकल्याची भीती दाखवून महिलेची सायबर फसवणूक

या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच योग्य वेळी चित्रपट निर्मात्यावर नोटीस बजावण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. डीपीएस तलाव तसेच एनआरआय कॉप्लेक्सच्या पाठीमागील पाणथळ परिसर, तसेच नेरूळ सीवूड्स येथील टी. एस. चाणक्य तलाव येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोचे आगमन होते. फ्लेमिंगोसाठी आवश्यक असलेले खाद्य, तसेच पाणथळ जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे फ्लेमिंगो येथे वास्तव्यासाठी येतात. नेरूळ येथील टी. एस. चाणक्य खाडीत हे चित्रीकरण करण्यात आल्याचे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे.

हेही वाचा – कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार

चित्रीकरणात ड्रोनच्या पात्यांमुळे फ्लेमिंगो जखमी होण्याची शक्यता असते. तसेच ड्रोनचा आवाजही बऱ्यापैकी असतो, यामुळे फ्लेमिंगो विचलित होऊन त्यांच्या अधिवासातून बाहर येऊ शकतात. परिणामी, कोणतीही दुर्घटना घडू शकते. यापूर्वीही या परिसरात अनेक फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याचीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पक्षीप्रेमींनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Story img Loader