धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणारी घटना मुंबईतल्या विले पार्ले या ठिकाणी घडली आहे. मुंबईतल्या विले-पार्ले या ठिकाणी दिलीप धावडे या ४१ वर्षीय तरूणाचा डोक्यात पाण्याचा फुगा लागल्याने मृत्यू झाला आहे. दिलीप धावडे हा तरूण एका शेअर ट्रेडिंग फर्ममध्ये काम करतो. रात्री १०.३० च्या सुमारास दिलीप धावडे आपल्या कुटुंबासाठी पुरणपोळी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी काय घडली घटना?

दिलीप धावडे हे पुरणपोळी घेऊन चालले होते. तेव्हा त्यांच्या अंगावर कुणीतरी पाण्याने भरलेला फुगा फेकला. ज्यानंतर ते खाली कोसळले. त्यांना हाका मारल्या गेल्या,बेशुद्ध झालेत असं वाटून शुद्धीवर आणण्याचाही प्रयत्न केला गेला पण त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांना तातडीने कूपर रूग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विले पार्ले पोलिसांनी या प्रकरणात ADR दाखल केला आहे. आता पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत.

दिलीप धावडे हे विले-पार्ले येथील शिवाजी नगर भागात असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास दिलीप धावडे हे पुरणपोळी घेऊन चालले होते. त्यावेळी स्थानिक लोक होळी पेटवून तो सण साजरा करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्यावर कुणीतरी पाण्याने भरलेला फुगा फेकला ज्यानंतर ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मिड-डे ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai kin say water balloon thrown by holi revellers killed vile parle man scj