मुंबई : कोकण रेल्वेवरील मुल्की स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्त शनिवारी आणि रविवारी ब्लाॅक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील रेल्वे गाड्या विलंबाने धावतील.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत मुल्की येथे ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे गाडी क्रमांक १२१३३ सीएसएमटी – मंगळुरू एक्स्प्रेस मडगाव – उडपीदरम्यान विलंबाने धावेल. ही रेल्वेगाडी तब्बल ८० मिनिटे विलंबाने धावेल. तर, २ मार्च रोजी सकाळी १०.५० ते दुपारी १.२० वाजेपर्यंत मुल्की येथे ब्लाॅक असेल. या ब्लाॅकमुळे गाडी क्रमांक १२१३३ सीएसएमटी – मंगळुरू एक्स्प्रेस मडगाव – उडपीदरम्यान ८० मिनिटे उशिराने धावेल. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास कालावधी वाढेल.

Story img Loader