मुंबई : देशातील सर्वात मोठी निवासी घर विक्रीची बाजारपेठ म्हणून मुंबईने आपले स्थान कायम राखले आहे. २०२४ मध्ये मुंबईत ९६ हजार १८७ घरांची विक्री झाली असून २०१४ पासून गेल्या १३ वर्षांतील ही सर्वात अधिक घरविक्री नोंदली गेली आहे. ‘नाईट फ्रॅंक इंडिया’ने जुलै ते डिसेंबर २०२४ या सहामाहीचा अहवाल वार्ताहर परिषदेत प्रसिद्ध केला. या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशांतील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत मुंबई घर विक्रीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे. देशातील अन्य शहरांमधील घर विक्रीत घट झालेली असताना मुंबईत मात्र ११ टक्के वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो.

गेल्या वर्षात मुंबईत ९६ हजार ४७० घरे उपलब्ध झाली. त्यापैकी ९६ हजार १८७ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षात निवासी घरांच्या किमतींमध्‍ये २०२३ च्‍या तुलनेत वार्षिक पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली. मुंबई सागरी मार्ग, मेट्रो लाइन तीन आणि मुंबई ट्रान्‍स हार्बर लिंक (एमटीएचएल) अशा पायाभूत प्रकल्‍पांमुळे मुंबई महानगर परिसरात घरांसाठी मागणी वाढत आहे.

Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर
jimi shergil career 50 flop movies
करिअरमध्ये तब्बल ५० चित्रपट झाले फ्लॉप, मात्र तरीही कोट्यवधी रुपये मानधन घेतो ‘हा’ अभिनेता
Chahatt Khanna New Home
दोन प्रेमविवाह, दोन्ही वेळा घटस्फोट; आता अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Puneri pati viral only punekars know how to make and deal with them
“आमच्या मुलाचे लग्न…” पुण्यात मुलाला स्थळ आणणाऱ्यांसाठी पालकांनी घराबाहेर लावली भन्नाट पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Parents Seeking Abortion, Abortion, High Court,
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य, उच्च न्यायालयाची टिप्पणी

हेही वाचा – आयआयटी, आयसर संशोधनाचे केंद्रबिंदू, केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांची माहिती

गेल्या वर्षात विक्री झालेल्या घरांमध्ये ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा समावेश होता. २०२३ च्या तुलनेत त्यात घट आढळून आली. यंदा एक ते दोन कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री अधिक झाली. याशिवाय दोन ते पाच कोटी रुपये किमतीच्या घरांनाही यावेळी मागणी होती. पाच ते दहा कोटी रुपये किमतीची १८६६ घरे तर दहा ते २० कोटी रुपये किमतीची ३६० घरे विकली गेली. २० ते ५० कोटींच्या १९२ घरांची विक्री नोंदवली गेली. २०२३ मध्ये या किमतीची ७९ घरे विकली गेली होती. २०२३ च्या तुलनेत घर विक्रीत वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

मुंबईतील निवासी घरांच्या किमतींमध्‍ये पाच टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. देशातील आठ प्रमुख शहरांमध्‍ये ही उच्चतम आहे. मध्‍य व दक्षिण मुंबई या सूक्ष्‍म बाजारपेठांमध्‍ये अनुक्रमे घरांच्या किमतीत सात ते आठ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. मध्य मुंबईतील घरविक्रीचा सरासरी दर ७० हजार रुपये प्रति चौरस फुटाच्या घरात होता. काही परिसरात ३३ हजार रुपये प्रति चौरस फुटाने घरांची विक्री झाली, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईत ६१ हजार रुपये प्रति चौरस फूट दर नोंदला गेला. नवी मुंबईत १७ ते १९ हजार रुपये तर काही ठिकाणी नऊ ते दहा हजार रुपये प्रति चौरस फुटाने घरविक्री झाली. पश्चिम उपनगरात वांद्रे ते विलेपार्ले, जुहू या परिसरात ७२ ते ८२ हजार प्रति चौरस फूट दर नोंदला गेला.

मुंबई सागरी मार्ग व मेट्रो आदी पायाभूत सुविधा प्रकल्‍पांमुळे प्रवास जलद झाला आहे. त्याचा परिणाम घरविक्रीवर दिसून येतो. यंदा मोठ्या आकाराच्या घरांना चांगली मागणी असल्याचे दिसून आले, असे नाईट फ्रॅंक इंडियाचे वरिष्‍ठ कार्यकारी संचालक गुलाम झिया यांनी सांगितले.

हेही वाचा – “कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत

घर विक्रीचे दर प्रति चौरस फूट ( स्रोत : नाईट फ्रॅंक)

लोअर परळ : ३३ ते ३७ हजार, ताडदेव : ६१ ते ८१ हजार, वरळी : ७० ते ९१ हजार, घाटकोपर : २१ ते २२ हजार, मुलुंड : २२ ते २३ हजार, पवई : २८ ते ३१ हजार, पनवेल : सहा ते सात हजार, वांद्रे पश्चिम : ७२ ते ८२ हजार, अंधेरी : २३ ते २४ हजार, बोरिवली : २४ ते २६ हजार, गोरेगाव : २१ ते २४ हजार, खारघर : नऊ ते दहा हजार, वाशी : १७ ते १९ हजार, बदलापूर : साडेचार ते पाच हजार, डोंबिवली : साडेआठ ते साडेनऊ हजार, मीरा रोड : ११,५०० ते १३ हजार, विरार : सहा ते सात हजार

Story img Loader