मध्य आणि हार्बर मार्गावरील दर रविवारचा ठरलेला मेग ब्लॉक आज (दि.28) रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आलेला नाही. तेथे ठरल्याप्रमाणेच मेग ब्लॉक घेतला जाणार आहे. हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य आणि हार्बर मार्गांवरील जाहीर करण्यात आलेले मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत.
यापूर्वी विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बरवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या भाईंदर ते वसई रोडदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉक कायम ठेवण्यात आलाय.
पश्चिम रेल्वे मेग ब्लॉक –
कुठे – भाईंदर ते वसई रोडदरम्यान अप व डाऊन जलद मार्ग
कधी – स. ११.०० ते दु. ३.००
परिणाम – ब्लॉकमुळे अप जलद रेल्वे विरार, वसई रोड ते भाईंदर, बोरिवलीदरम्यान अप धिम्या मार्गावर, तर डाऊन जलद गाडय़ा बोरिवली ते वसई रोड, विरारदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर धावतील.