Mumbai : एका तरुणाचा शिवडी स्टेशनवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर याच महिन्यात व्हायरल झाला होता. Mumbai लोकल सुरु असताना हा तरुण लोकलला लटकून पाय घासत जातो आणि प्लॅटफॉर्म संपल्यावर लोकलमध्ये चढतो असं या व्हिडीओत दिसत होतं. या तरुणाचा शोध लागला आहे, दुसऱ्या एका स्टंटमध्ये या तरुणाला एक हात आणि पाय गमावावा लागला आहे. त्यामुळे आता त्याने असे स्टंट करु नका असं आवाहन केलं आहे. मध्य रेल्वेने (Mumbai) या तरुणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच असे स्टंट करु नका हे आवाहन केलं आहे. मराठी भाषेत मोरा तुझे गेले पाय, आता रडून उपयोग काय? अशी एक म्हण आहे त्याचा तंतोतंत प्रत्यय या घटनेने तरुणाला दिला आहे यात शंकाच नाही.

१५ जुलैला व्हायरल झालेल्या व्हिडीओत काय?

लोकल ट्रेनच्या दारात लटकून तरुण स्टंट करताना दिसतो आहे. लोकल सुरु झाली आहे. त्या धावत्या लोकलमधल्या एका डब्याच्या खांबाला पकडून हा तरुण प्लॅटफॉर्मवर पाय ठेवून वेगाने जाताना दिसतो आहे. त्याला डब्यातले लोक सांगत आहेत की असं करु नकोस तरीही तो कुणाचंही ऐकत नाही. शेवटी प्लॅटफॉर्म संपायला येतो तेव्हा घाईने तो डब्यात चढतो आहे. अशा हुल्लडबाज प्रवाशांमुळे शिस्तीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या. अशा स्टंटबाजांना आवरा, हवेत कशाला जीवघेणे स्टंट?, असे लोक स्वतःची माती करुन घेतात अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी या व्हायरल व्हिडीओवर दिल्या. Mumbai मध्ये अनेकदा असे स्टंट करताना तरुण दिसतात. त्यांनी असे स्टंट करु नयेत असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.

Heavy rains in Gujarat many trains cancelled
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रेल्वेगाड्या…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Central Railway disrupted due to technical glitch
Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
young man commits suicide under a running train due to a financial dispute
आर्थिक वादातून तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या
Escalators, Kalyan Railway Station, Kalyan,
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर सरकत्या जिन्यांची उभारणी
A religious twist in the case of assaulting a ticket inspector on the Western Railway Mumbai
मुंबई: तिकीट तपासनीसला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण
Railway transport services disrupted due to agitation at Badlapur
बदलापूर-कर्जत रेल्वे वाहतूक ठप्पच, सहा तासानंतरही ठिय्या आंदोलन कायम
kalyan bus passenger looted marathi news
कल्याणमध्ये वाशी बसमध्ये चढताना तीन भामट्यांनी प्रवाशाला लुटले

हे पण वाचा- Mumbai Local Accident : डेक्कन क्वीनच्या प्रवाशांना बघण्याच्या नादात लोकलमधून पडला, खांबाला धडकला अन्…; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल!

News About Mumbai Viral Video
१५ जुलै रोजी एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा तरुण शिवडी स्थानकात स्टंट करताना दिसत होता. या तरुणाचं नाव फरहत असून त्याला आता एक हात आणि पाय गमवावा लागला आहे.

आता नेमकं काय घडलं आहे?

Mumbai मधल्या व्हायरल व्हिडीओतल्या या तरुणाचा मध्य रेल्वेकडून शोध सुरु होता. जेव्हा या तरुणाचा शोध लागला तेव्हा त्याने एक पाय आणि एक हात गमावला. शिवडीमध्ये स्टंट केल्यानंतर या तरुणाने आणखी एका ठिकाणी स्टंट केला. त्यामुळे त्याला त्याचा हात आणि पाय गमावावा लागला. या तरुणाचे नाव फरहत आझम शेख असून तो अँटॉप हिल, वडाळा येथील रहिवासी आहे. आरपीएफने या तरुणाकडे विचारणा केली असता त्याने व्हायरल व्हिडीओ माझाच आहे अशी कबुली दिली. हा व्हिडीओ ७ मार्च रोजी तयार करण्यात आला होता. शिवडी ते सीएसएमटी लोकलमधून हा स्टंट करण्यात आला होता. यानंतर १४ एप्रिल रोजी मस्जिद बंदर स्थानकात दुसरा स्टंट करत असताना आझम शेखला एक हात आणि पाय गमावावा लागला आहे.

फरहत आझम शेखने काय म्हटलं आहे?

“सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ माझाच आहे. मार्च महिन्यात शिवडी स्थानकात मी तो स्टंट केला होता. एप्रिल महिन्यातही मी असाच स्टंट करत होतो तेव्हा मला एक हात आणि पाय गमावावा लागला आहे.”

मध्य रेल्वेचं स्टंटबाजांना आवाहन

मध्य रेल्वेने या तरुणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच लोकल ही तुमच्या प्रवासासाठी आहे असले स्टंट करण्यासाठी नाही. त्यामुळे असे स्टंट करु नका असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.