Mumbai Local : लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेची लोकल सेवा आहे. आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी जाण्यासाठी तसंच संध्याकाळी घरी जाण्यासाठी लोकलचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. याच लोकलमध्ये टीसीला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

चर्चगेटहून विरारच्या दिशेने एसी लोकल निघाली होती. या एसी लोकलमध्ये ( Mumbai Local ) जसबीर सिंग हे टीसी चढले होते. त्यांनी तिकिट तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी तीन जण फर्स्ट क्लासचं तिकिट घेऊन एसी लोकलमध्ये ( Mumbai Local ) चढले. त्यामुळे जसबीर सिंग यांनी या तिघांना दंड ठोठावला. मात्र हे तिघेही टीसी जसबीर सिंग यांच्याशी वाद घालू लागले. नंतर या वादाचं रुपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झालं. जसबीर सिंग यांचा शर्ट फाडत आणि त्यांना प्रचंड प्रमाणात शिवीगाळ करत या तिघांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणी जसबीर सिंग यांना दुखापत झाली आहे. जसबीर सिंग हे मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून काम करतात.

नेमका वाद कसा सुरु झाला?

चर्चगेटहून विरारच्या दिशेने निघालेली लोकल ( Mumbai Local ) बोरिवली स्थानकात पोहचत होती. त्यावेळी जसबीर सिंग हे तिकिट तपासत एक एक डब्यात पुढे जात होते. त्याचवेळी तीन प्रवाशांकडे फर्स्ट क्लासचं तिकिट आहे एसीचं नाही हे त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनी या तिघांनाही सांगितलं की तुम्ही तिघांनी दंड भरा आणि पुढचा प्रवास सुरु ठेवा. अशात अनिकेत भोसले नावाच्या एका प्रवाशाने त्यांच्याशी वाद सुरु केला. यानंतर सिंग यांनी या तिघांना बोरिवली स्थानकात उतरा असे सांगितले मात्र तिघांनीही नकार दिला आणि वाद घालण्यास सुरुवात केली.

हे पण वाचा- मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक

व्हायरल व्हिडीओत काय?

यानंतर अनिकेत भोसले, त्यांच्यासह असलेले दोघेजण आणि टीसी जसबीर सिंग यांच्यात हाणामारी झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं आहे त्यानुसार हे तिघंही त्यांच्यावर धावून जातात, शर्ट फाडतात आणि शिवीगाळ करत त्यांना मारहाण करु लागतात. अनिकेत भोसले आणि इतर दोघांनी या टीसीला शिव्याही दिल्या. या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपी या रेल्वे डब्यात ( Mumbai Local ) आले. त्यानंतर सिंग यांनी सगळा प्रकार सांगितला. अभिषेक यादव या मुंबईकराने या सगळ्यानंतर काय घडलं तो व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जसबीर सिंग काय म्हणाले?

जसबीर सिंग यांनी सांगितलं की, “मी भोसले आणि इतर दोघांना बोरिवली स्थानकात ( Mumbai Local ) उतरण्यास सांगितलं पण त्यांनी उतरण्यास नकार दिला. या तिघांनी माझा शर्ट फाडला. त्यामुळे इतर प्रवाशांकडून गोळा करण्यात आलेले दंडाचे १५०० रुपये खाली पडले.” असंही जसबीर सिंग यांनी सांगितलं. ही ट्रेन या भांडणामुळे बोरिवली स्थानकातच थांबवण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी आरोपी भोसले आणि इतर दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली. मात्र सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने भोसले यांनी चूक मान्य करत लेखी माफी मागितली. तसंच हरवलेले दीड हजार रुपयेही देण्याचं मान्य केलं. ज्यानंतर जसबीर सिंग यांनीही त्याला माफ केलं आणि हे प्रकरण मिटलं. हा प्रकार गुरुवारी घडल्याची माहिती आहे. टाइम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local news tc jasbeer sing beaten by three people in borivali video viral scj