मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली येथे शनिवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे लोकल सेवा २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होती. ऐन गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने धीम्या, जलद, वातानुकूलित लोकल कूर्मगतीने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब झाला.

कांदिवली येथे शनिवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर, पश्चिम रेल्वेवरील बोरिवली – गोरेगाव स्थानकांदरम्यान लोकल विलंबाने धावत होत्या. तसेच अनेक लोकल दोन स्थानकांच्या दरम्यान एका मागे एक उभ्या होत्या. लोकल खोळंबल्यामागचे नेमके कारण प्रवाशांना समजत नव्हते. त्यामुळे लोकलमधील प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी रेल्वे मार्गावर उतरून नजिकचे स्थानक गाठले आणि रस्ते मार्गे कार्यालय गाठले. कार्यालयीन वेळेत झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
The employees deployed on election duty should be given leave on the day after the election Demand of the Municipal Union Mumbai news
निवडणूक कर्तव्यार्थ तैनात कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतरच्या दिवशी सुटी द्यावी
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा : बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्यात भाजप मंत्र्यावर आरोप; पोलीस उपायुक्ताच्या याचिकेनंतर खळबळ पोलीस महासंचालकांकडेही बोट

सिग्नल यंत्रणेतील बिघाडाची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सकाळी ८.४० वाजता सिग्नल यंत्रणा दुरूस्त करण्यात आली. मात्र, त्यायानंतरही अनेक लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे नोकरदारांना कार्यालयात, विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यास विलंब झाला. त्यानंतर सकाळी १० नंतर जलद मार्गावरील लोकल १० ते २० मिनिटे, तर धीम्या लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवासी हैराण झाले.