रविवार म्हणजे मेगाब्लॉक हे आता नित्याचेच झाले आहे.  या रविवारीही प्रवाशांना मेगाब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर संदर्भातील कामे हाती घेण्यात आल्याने पश्चिम आणि मध्य मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.
*वडाळा रोड ते वांद्रे दरम्यान अप व डाऊन लाइनवर सकाळी ११.१० दुपारी ३.१० या काळात मेगाब्लॉक. त्यामुळे सकाळी १०.५२ ते दुपारी ३.१३ या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व पनवेल, बेलापूर, वाशी रेल्वेगाडय़ा सीएसटी-कुर्ला दरम्यान चालविण्यात येतील. या गाडय़ा चिंचपोकळी व करिरोड स्थानकांवर थांबणार नाहीत. सीएसटी ते वांद्रे, अंधेरी लोकल सकाळी १०.४० ते दुपारी ४.१३ या काळात स्थगित करण्यात आल्या आहेत.
*गोरेगाव ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यानच्या धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ जम्बोब्लॉक आहे. या काळात धिम्या गाडय़ा जलद मार्गावरुन धावणार आहेत.बोरिवलीमधील ३, ४, ५, ६ आणि ६ ए या फलाटावर गाडय़ा थांबविण्यात येतील.
*विद्याविहार-भायखळा अप धिम्या मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ दरम्यान मेगाब्लॉक. या काळात घाटकोपरहून सोडण्यात येणाऱ्या धिम्या मार्गावरील गाडय़ा विद्याविहार-भायखळा दरम्यान जलद मार्गावरुन धावतील. सीएसटीवरुन सकाळी १०.०८ ते दुपारी २.४० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील जलद गाडय़ा धिम्या मार्गावरुन धावतील.

Story img Loader