भाईंदरहून सुटलेली लोकल रविवारी सकाळी चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक तीनमध्ये अवरोधक भेदून थेट फलाटावर चढली. गाडी चर्चगेट स्थानकाच्या इमारतीपासून फक्त दोन फूट अंतरावर थांबली. या घटनेत पाच प्रवासी आणि मोटरमन किरकोळ जखमी झाले. दरम्यान, अपघातामुळे दिवसभरात ७० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामंजस्य करार करीत असताना चर्चगेट स्थानकात मात्र रेल्वेच्या इतिहासातील ‘न भूतो (कदाचित) न भविष्यति’ असा अपघात झाला. भाईंदरहून चर्चगेटच्या दिशेने येणारी गाडी रविवारी सकाळी ११.२० वाजता चर्चगेट स्थानकात शिरली. नेहमीप्रमाणे या गाडीचा वेग कमी झाला नाही आणि काही क्षणांतच ही गाडी स्थानकाच्या शेवटी असलेल्या अवरोधकांवर आपटली. ती एवढय़ावरच थांबली नाही. गाडी अवरोधक भेदून थेट फलाटावर चढली आणि तब्बल २० ते ३० फूट अंतर पुढे गेली. त्यानंतर चर्चगेट स्थानक इमारतीच्या अगदी दोन फूट अंतरावर गाडी थांबली. या प्रकारामुळे स्थानकावरील अनेक प्रवासी घाबरले. गाडीतील प्रवाशांनाही चांगलाच हादरा बसला. दरम्यान, डबा हलविण्याचे काम सुरू असताना डब्याचा ट्रान्सफॉर्मर अडकल्याचे निदर्शनास आले. तो काढण्याची प्रक्रिया खूप अवघड असल्याने रात्री उशीरापर्यंत या कामात रेल्वे प्रशासनाला यश आले नव्हते. तरीही प्रवाशांना याचा फटका बसू न देण्याचा प्रयत्न असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांनी स्पष्ट केले.
व्हिडिओ: लोकल थेट फलाटावर!
भाईंदरहून सुटलेली लोकल रविवारी सकाळी चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक तीनमध्ये अवरोधक भेदून थेट फलाटावर चढली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-06-2015 at 01:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train crashes into platform at churchgate station