मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे बुधवारी सकाळी ११.२० च्या सुमारास लोकल रुळावरून घसरली. ही लोकल कारशेडमध्ये जात होती. त्यामुळे लोकलमध्ये प्रवासी नव्हते. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील पनवेल-कळंबोली येथे नुकतीच मालगाडी घसरल्याची घटना घडली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : मुंबईत पदपथावरील मार्ग प्रतिबंधक अपंगांसाठी ठरत आहेत अडथळा, उच्च न्यायालयाकडून दखल
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये रिकामी लोकल जात असताना तिचे एक चाक रेल्वे रुळावरून घसरले. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे. तसेच सर्व डाऊन धीम्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
First published on: 04-10-2023 at 12:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train derailed western railway services disrupted mumbai print news css