मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रुझ अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. तर, रविवारी हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेलदरम्यान आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नाही.
मध्य रेल्वे –
मुख्य मार्ग :
कुठे : ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर कधी : रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
परिणाम : सीएसएमटी डाऊन जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंडपुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी/दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी/दादरला येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस कल्याण ते ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
हेही वाचा >>> मुंबई :पश्चिम रेल्वेवर ३५० तिकीट तपासनीसांची फौज
पश्चिम रेल्वे –
कुठे : माहीम ते सांताक्रुझ अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गावरील लोकल माहीम आणि सांताक्रुझ/अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही लोकल रद्द राहतील. तसेच बोरिवली आणि अंधेरीतील काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालविल्या जातील.