मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेकडून नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी हार्बर मार्गावरील अंधेरी – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्रकालीन १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ पासून ते दुपारी ०३.५५ पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तर, विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसेल.

हेही वाचा >>> Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक; अनेक लोकल रद्द, तर काहींच्या वेळेत बदल

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला – वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० पासून ते दुपारी ०४.१० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि कुर्ला – पनवेल / वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मुंबईत शनिवारी हलक्या सरी; राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

हार्बर मार्ग

कुठे : अंधेरी – गोरेगाव अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत अंधेरी – गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध नाही.