Mumbai Local Train Update Overhead Wire Break: मुंबईतील दिवा आणि कोपर या दरम्यानची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे डाऊन लोकल मार्गावरील मध्य रेल्वेची (Central Railway) लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे दिवा आणि कोपर या दरम्यानची डाऊन लोकल मार्गावरील लोकल सेवा कोलमडली आहे. याचा फटका प्रवाशांना बसला आहे. अनेक जणांना सकाळी कामावर जाण्याची घाई असते. मात्र, ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवाशांचा खोळंबा

दिवा आणि कोपर या दरम्यानची ओव्हरहेड वायर (Overhead Wire) तुटल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी कामावर निघणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. ही सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी तातडीने या ठिकाणी पोहोचून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु केल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच पुढील काही तासांत या मार्गावरील लोकल सेवा वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : वरळीतील सत्यम’ चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जाणार; आरक्षण बदलण्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती सूचना

मध्य रेल्वेने काय म्हटलं?

दिवा आणि कोपर या दरम्यानची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे या मार्गावरील मध्य रेल्वेची (Central Railway) लोकल सेवा विस्कळीत झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक्सवर (ट्विटर) यासंदर्भातील माहिती देण्यात आली. मध्य रेल्वेने म्हटलं की, दिवा आणि कोपर दरम्यान पहाटे ३ :१० वाजता ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) तुटल्यामुळे डाऊन लोकल मार्गावरील सेवांमध्ये व्यत्यय आला आहे. विलंब कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल मनापासून खेद आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई लोकलची सेवा कोलमड्यानंतर याचा सर्वात मोठा फटका हा लोकलने प्रवास करणाऱ्यांना बसत असतो. कारण मुंबईतील लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. अनेक विद्यार्थी आपल्या शाळा-कॉलेजला जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात. मात्र, अचानक हा बिघाड झाल्याने या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर होणार असल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळे अनेकजण संतप्त झाले आहेत. दिवा ते कोपर दरम्यान ओव्हरहेडमधील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे स्टेशनवरही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train update overhead wire break in diva and kopar railway station thane local gkt