मुंबई : सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे  सोमवारी पहाटेपासून लोकल सेवा ठप्प झाली. दुपारी पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर गाड्या सुरू झाल्या. मात्र सायंकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला. त्यामुळे वडाळा रेल्वे रुळावरील ओसरलेले पाणी पुन्हा भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा रात्री १०.१५ वाजल्यापासून अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अखेर पाच तासांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस सीएसएमटीला पोहोचली

हार्बरवरील प्रवाशांनी मुख्य मार्गावरून कुर्ला स्थानकापर्यंत प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान मानखुर्द ते पनवेल दरम्यान लोकल सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. दादर येथे तांत्रिक बिघाड पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच येथे रात्री १० च्या सुमारास बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. अप दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर परिणाम झाल्याने, जलद लोकल आणि दोन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबल्या होत्या. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून  दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train update services on harbour line from cstm to mankhurd disrupted due to water logging on tracks mumbai print news zws
Show comments