मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना लोकलची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मनस्तापास सामोरे जावे लागले. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सोमवारी विस्कळीत झाली होती. त्यानंतर पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने मंगळवारी सकाळी या मार्गावरील लोकलची वाहतूक खोळंबली. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार दरम्यान सकाळी ८.३० वाजता तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण लोकल सेवा काही काळ कोलमडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेक लोकल १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत होती. तर, सकाळी ७.१५ च्या सुमारास हार्बर मार्गावर वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल बिघाड झाल्याने लोकल सेवा खोळंबली. अनेक लोकल एकामागे एक उभ्या होत्या. या बिघाडामुळे अनेक लोकल उशिराने धावत होत्या. परिणामी प्रवाशांना इच्छित स्थानकात पोहोचण्यास विलंब झाला. दरम्यान रेल्वे विभागाने बिघाड दुरुस्त करून काही वेळाने लोकल सेवा सुरळीत करण्यात आली. मात्र या गोंधळाचा परिणाम दिवसभराच्या वेळापत्रकावर झाला.