मुंबई : मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि इतर अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरील सीएसएमटी – विद्याविहार, हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. यासह मुख्य, हार्बर मार्गावरील ब्लाॅक कालावधीत कुर्ला – पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – सांताक्रूझदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वसई-विरारसाठी ‘सूर्या’चे १८५ दशलक्ष लिटर पाणी; ‘एमएमआरडीए’च्या निर्णयामुळे दिलासा 

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कधी : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कुठे : रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. यावेळी सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला आणि त्यानंतर नियोजित स्थानकात थांबा घेतील.

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ९.५३ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी – वाशी / पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी – गोरेगाव / वांद्रे लोकल रद्द असतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : गोरेगाव – सांताक्रूझ पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर

कधी : शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत

परिणाम : शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लाॅक घेण्यात येणार नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train western railways to operate mega block on saturday central railway on sunday mumbai print news zws