मुंबई : मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम दरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.
●मध्य रेल्वे मुख्य मार्ग
कुठे : सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल फेऱ्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील.
हेही वाचा : मुंबईसाठी ३०० नव्या लोकल फेऱ्या,वसई भव्य रेल्वे टर्मिनल; केंद्राची मुंबईकरांना भेट
●हार्बर मार्ग
कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असेल. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका उपलब्ध असेल.
हेही वाचा : भाजपमध्ये अस्वस्थता; आठवड्यानंतरही घोषणा नाही,शहांकडील बैठकीनंतरही तिढा कायम
●पश्चिम रेल्वे
कुठे : मरीन लाईन ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते माहीम स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर चालवल्या येतील. त्यामुळे या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्थानकावर थांबणार नाहीत.