मुंबई : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. आज सकाळी दादर येथून ठाण्यापर्यंत धिम्या मार्गावर उपनगरीय सेवा विलंबाने सुरू होती. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची गर्दी झाली होती.
कुर्ला येथून हार्बर सेवा खंडित असून पनवेल ते सीएसएमटी सेवा खंडित असल्याची उद्घोषणा करण्यात आली आहे. तर पनवेल ते वाशी दरम्यान हार्बर सेवा सुरू झाल्याची उद्घोषणा कुर्ला स्थानकात करण्यात येत असल्याची माहिती प्रवाशांकडून प्राप्त झाली आहे.