ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा खंडित झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून ही सेवा खंडित झाली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून समजली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात पश्चिम रेल्वेवरील माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान गर्डर उभारणीचं काम हाती घेण्यात आलं होतं. याकरता २४-२५ जानेवारी आणि २५-२६ जानेवारी रोजी मेगाब्लॉकही घेण्यात आला होता. या गर्डर उभारणीचं काम यशस्वी झालं असून येथे नियमित रुटीन कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे दोन तासांपूर्वी पश्चिम मार्गावरील या स्थानकांदरम्यान वेग मर्यादा लावण्यात आली आहे. वेग मर्यादा कमी झाल्याने सर्व लोकल धीम्या गतीने चालत आहेत. परिणामी संपूर्ण वेळापत्रक कोलमडले असून ऐन गर्दीच्या वेळीच ही समस्या उद्भवली असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

बातमी अपडेट होत आहे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local western railway delay due to technical glitch between bandra and mahim station sgk