लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी येत असतात. पश्चिम रेल्वेने गणेशभक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जादा आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Preparation of 204 artificial ponds for Ganesh immersion Municipal Corporation complete
मुंबई : गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, महापालिकेची तयारी पूर्ण
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
rain will continue in state for next three day
नागपूर : आज, उद्या पावसाचा अंदाज, अनंत चतुर्दशीला मात्र…
Central Railway run 22 extra night trains for Ganeshotsav between CST and Thane Kalyan
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त लोकलच्या २२ जादा फेऱ्या
During Ganeshotsav period technical failure on Central and Western Railways, late arrival of local trains increased Mumbai news
लोकल विलंबाचे विघ्न दूर होईना; सलग तीन दिवस मुंबईकरांचा प्रवास खोळंबला
Traffic restrictions on central roads in Nashik during Ganeshotsav 2024
गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद
Second girder installation of Gokhale Bridge The other side of the bridge will be opened in the month of April Mumbai new
गोखले पुलाचा दुसरा गर्डर स्थापन; एप्रिल महिन्यात पुलाची दुसरी बाजू खुली होणार
Pimpri, Ganesh utsav, police deployed,
पिंपरी : गणेशोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; ध्वनी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या सूचना

मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणपतीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होते. त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा-मुंबई : परतीच्या प्रवासासाठी १४ विशेष रेल्वेगाड्या

चचर्गेटहून विरारसाठी रात्री १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२० वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि पहाटे ३ वाजता लोकल सुटेल. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट यादरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध असतील, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.