मुंबई / ठाणे : India Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Updates राज्यातील पहिल्या चार टप्प्यांपेक्षा सोमवारी मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मतदानाचा उत्साह अधिक होता. धृवीकरणाच्या शक्यतेने दोन्ही बाजूंचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जोर लावल्याने मतदार सकाळपासूनच हिरिरीने बाहेर पडले. मात्र आयोगाच्या नियोजनातील ढिसाळपणाने या उत्साहावर पाणी पाडले. संथ प्रक्रियेमुळे अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. कडक उन्हात ताटकळत राहावे लागल्याने मतदारांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यात राज्यातील उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई तसेच ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या १३ मतदारसंघांत अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. मात्र कमी-अधिक प्रमाणात या सर्वच मतदारसंघांत यंत्रणांच्या दिरंगाईचा त्रास मतदारांना सहन करावा लागला. एरवी मतदान करून लगेच बाहेर येता येते, मात्र यावेळी बरीच रखडपट्टी झाल्याची तक्रार मतदार करीत होते. मतदान केंद्रांची संख्या कमी केल्याचा अनुभव आल्याचे काही जणांनी सांगितले. २०१९च्या निवडणुकीपर्यंत एका मतदान केंद्रात चार किंवा अधिक कक्ष असत. मात्र यावेळी दोनच खोल्यांचा वापर झाला. त्यामुळे कक्षनिहाय मतदारांची संख्या वाढल्याने रांगा लागल्या. मतदान प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्याऐवजी नाहक गोंधळ घातल्याचा आरोप मतदारांनी केला. मतदार याद्यांची पुनर्रचना करतानाही घोळ झाला. अनेकांची मतदान केंद्रे बदलली तर काहींची घरापासून दूर होती. एकाच घरातील व्यक्तींचे मतदान भिन्न भिन्न केंद्रांमध्ये आले होते. यामुळे मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मतदार यादीतून नाव अचानक गायब झाल्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला.

mumbai This election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Belapur vidhan sabha election
गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत
Rajasthan By-Election Independent candidate assault SDM
Rajasthan By-Election : अपक्ष उमेदवाराची अधिकाऱ्याला मारहाण; कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक, वाहनं पेटवली, जिल्ह्यात तणाव
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल

हेही वाचा >>> मुंबई : मतदान केंद्रावरील गैरसोयीबाबत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी

मतदान यंत्र आणि व्हिव्हीपॅटमध्ये बिघाड, विजेचा खेळखंडोबा आणि कर्मचाऱ्यांचा संथ कारभार यामुळे वाढत्या उन्हातही उत्साहाने मतदानाला आलेल्यांचे प्रचंड हाल झाले. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र परिसरात मोठा मंडप उभारणार, रांगेत उभे राहवे लागू नये यासाठी टोकन देऊन विश्रांती कक्षात बसण्याची व्यवस्था करणार, पाणी, ओआरएसची व्यवस्था करणार अशा अनेक घोषणा आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात बहुतांश केंद्रांवर यातील एकही सोय दिसली नाही. अनेक ठिकाणी मैदानात पत्र्याच्या शेडमध्ये मतदान केंद्रे उभारली होती. तेथे पंखे,पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांचीही गैरसोय झाली. या ढिसाळपणामुळे काही ठिकाणी तर मतदान न करताच मतदार परत जात असल्याचे दिसले.

आठ जणांना उन्हाचा त्रास, एकाचा मृत्यू

दक्षिण मुंबई मतदारसंघातील अरविंद सावंत यांचे मतदान केंद्र प्रतिनिधी मनोहर नलगे (६२) यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मतनदान केंद्रावरील गैरसोयींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला. कोंदट वातावरण, मोकळ्या हवेचा अभाव, शैाचालयाची दुर्गंधी यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे मतदानासाठी भर उन्हात रांगेत उभ्या असलेल्या आठ जणांना चक्कर येणे, निर्जलीकरण असा त्रास झाला. त्यांना महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, पंखे आदी सुविधांचा अभाव यामुळे मतदारांचे अतोनात हाल झाले.