लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबईतील सहा मतदारसंघांत सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली असून सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये झालेला बिघाड, मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी आल्यामुळे लागलेल्या लांबच लांब रांगा, मतदारयादीतील घोळ, तर कुठे खंडित झालेला वीजपुरवठा अशा विविध कारणांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानखुर्दमध्ये, मुलुंड आणि भांडुप येथे मतदान प्रक्रियेत तांत्रिक अडथळे

मानखुर्द येथील बूथ क्रमांक ६३ आणि ६५ वरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. मतदान यंत्र तातडीने बदलण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. मुलुंड येथील बूथ क्रमांक १२६ वरील मतदान यंत्रातही बिघाड झाला होता, मात्र तत्काळ दुरुस्ती केल्यानंतर तेथील मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले. भांडुप खिंडीपाडा परिसरातील मतदान केंद्रावरील विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली. अर्ध्या तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने मतदान बंद पडले होते.

हेही वाचा – भांडुपमध्ये उद्धव ठाकरे गटाचे दोन कार्येकर्ते पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा – उन्हाच्या झळा, तरीही मतदानासाठी रांगा; दक्षिण मध्य मुंबईतील धारावीत मतदानासाठी मोठ्या रांगा, पोलिसांचा फौजफाटा तैनात

लांबच लांब रांगा

घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी, बर्वेनगर, पारशीवाडी, चिरागनगर, माणिकलाल मैदान, जागृती नगर, श्रेयस दामोदर पार्क, अग्निशामक दल पार्कसाईट आणि विक्रोळी पार्कसाईट येथील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यानंतरही मतदान केंद्रांवर अशीच परिस्थिती होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai long queues problems of voting machines power outage disruption of voting process due to various reasons mumbai print news ssb