Mahavikas Aghadi Mahamorcha: महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं गेलं. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. महामोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

MVA Mahamorcha Live Updates, 17 December 2022 : मुंबईत ‘महामोर्चा’ विरुद्ध ‘माफी मांगो आंदोलन’!

13:20 (IST) 17 Dec 2022
शिंदे फडणवीस सरकार, तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही – संजय राऊत

आजचा मोर्चा सांगतो की महाराष्ट्राच्या जनतेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केलं आहे. या मोर्चानं इशारा दिलाय की शिंदे फडणवीस सरकार, तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही. या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा, डॉ. आंबेडकरांचा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कुणी सत्तेत बसू शकेल का? पाहा या मोर्चाकडे. आज दिल्लीही दुर्बिणीतून बघत असेल की महाराष्ट्राची ताकद काय आहे. आज महाराष्ट्र पेटलायय. ही ठिणगी पडली आहे. – संजय राऊत

13:14 (IST) 17 Dec 2022
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सभास्थळी दाखल, मोर्चाला संबोधित करणार

ठाकरे कुटुंबीय सभास्थळी दाखल, लवकरच दिग्गजांची होणार भाषणं… शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आदी दिग्गज काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष!

13:09 (IST) 17 Dec 2022
उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरेही मोर्चामध्ये सहभागी!

मुंबईमध्ये मविआकडून काढण्यात आलेल्या महामोर्चामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही सहभाही झाल्या आहेत. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय, यावेळी रश्मी ठाकरेही त्यांच्यासमवेत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या मुद्द्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

12:33 (IST) 17 Dec 2022
“हे राज्यपालांना अजिबात हटवणार नाहीत, कारण…”, जितेंद्र आव्हाडांचं शिंदे सरकारवर टीकास्र

महापुरुष तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत की नाहीत? त्यांचा अपमान होत असताना तुमची भूमिका काय? राज्यपालांना हे अजिबात हटवणार नाहीत. मराठी माणसाला आम्ही विचारतच नाहीत ही नेहमी यांची भूमिका असते. – जितेंद्र आव्हाड

12:26 (IST) 17 Dec 2022
Mumbai Mahamorcha: भाजपच्या मोर्चाला महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही – अमोल मिटकरी

भाजपच्या मोर्चाला महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही

पाहा Video

12:16 (IST) 17 Dec 2022
बाळासाहेबांच्या विचारांचे म्हणवून घेणारे मुख्यमंत्री भाजपाच्या टेकूवर सत्तेत बसले आहेत. तरी… – संजय राऊत

हे दुर्भाग्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात स्वत:ला बाळासाहेबांच्या विचारांचे म्हणवून घेणारे मुख्यमंत्री भाजपाच्या टेकूवर सत्तेत बसले आहेत. तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ. आंबेडकरांचा, जोतिबा फुलेंचा अपमान होतोय. महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात आहेत आणि हे गप्प बसले आहेत. – संजय राऊत

12:07 (IST) 17 Dec 2022
सत्ताधाऱ्यांचा अहंकार आम्हाला मोडायचा आहे – अमोल मिटकरी

'भाजपाचा मोर्चा म्हणजे राजकारण'; रोहित पवार यांची भाजपाच्या मोर्चावर टीका

पाहा Video

12:04 (IST) 17 Dec 2022
मुंबईत मविआच्या महामोर्चाला सुरुवात…

मुंबईतील क्रुडस कंपनीकडून महामोर्चाला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.

12:01 (IST) 17 Dec 2022
“सरकारमध्ये असताना ‘बंद’ करता, लाज वाटायला पाहिजे”, ‘ठाणे बंद’वरून राजन विचारे संतापले; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आता…”

राज्यपाल कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल’ या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी आज रस्त्यावर उतरणार आहे. तर महाविकास आघाडीच्या मोर्च्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाच्यावतीने ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येत आहे. तसेच सुषमा अंधारेंविरोधात शिंदे गटाकडून 'ठाणे बंद'ची देखील हाक देण्यात आली आहे. दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही सरकारमध्ये असताना बंद करता, याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, असेही ते म्हणाले. सविस्तर वाचा –

11:51 (IST) 17 Dec 2022
अधिवेशनातही या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडणार – छगन भुजबळ

हे आंदोलनाचं पहिलं पाऊल आहे. यापुढेही या आंदोलनाची तीव्रता हळूहळू वाढत जाणार. याचे पडसाद अर्थात अधिवेशनात पाहायला मिळणार. महागाई, बेरोजगारी, राज्यातून जाणारे उद्योग, महापुरुषांचा अपमान हे विषय अधिवेशनात नक्कीच येणार आहेत. त्यावर सगळे भूमिका मांडणार आहेत – छगन भुजबळ

11:49 (IST) 17 Dec 2022
आम्ही माफी का मागायची? – छगन भुजबळ

राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत त्यांनी चुका केल्या आणि माफी आम्ही का मागायची? फक्त लोकांचं लक्ष मोर्चाकडून दूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून हे सगळं केलं जात आहे – छगन भुजबळ

11:48 (IST) 17 Dec 2022
आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या मुंबईच्या सीमेवर अडवल्या – भाई जगताप

आमच्या गाड्या टोलनाक्यावर अडवल्या आहेत. तरी मुंबईत लाखो कार्यकर्ते इथे जमले आहेत. लवकरच मोठे नेते इथे येतील आणि काही वेळातच मोर्चाला सुरुवात होईल. – भाई जगताप

11:46 (IST) 17 Dec 2022
सरफरोशी की तमन्ना… – जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट!

मुंबईत महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सूचक ट्वीट केलं आहे.

11:45 (IST) 17 Dec 2022
MVA Mahamorcha: ‘मविआ’च्या मोर्चासाठी राष्ट्रवादी,ठाकरे गटाचे नेते मुंबईकडे रवाना

'मविआ'च्या मोर्चासाठी राष्ट्रवादी,ठाकरे गटाचे नेते मुंबईकडे रवाना

11:43 (IST) 17 Dec 2022
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे थोड्याच वेळात मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील आमदार-खासदार मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

11:35 (IST) 17 Dec 2022
भीतीमुळे हे मोर्चे निघत आहेत – चंद्रशेखर बावनकुळे

राज्यपालांच्या एका वाक्यावर निषेध व्यक्त केला जातोय. महापुरुषांच्या नावाने फोटो लावून निषेध केला जातोय. पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ही सुपरफास्ट गाडी आहे. या भीतीमुळे हे मोर्चे निघत आहेत – चंद्रशेखर बावनकुळे

11:32 (IST) 17 Dec 2022
“दिल्लीत गेले तेव्हा मेंदू गहाण ठेवू आले की काय, झालं काय मुख्यमंत्र्यांना?”

शिवाजी महाराजांचा अपमान करणारा राज्यपाल राजभवनात आहे. दिल्लीत गेले तेव्हा मेंदू गहाण ठेवू आले की काय? झालं काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. तुम्ही लाचार आहात, मिंधे आहात, खोकी मोजत बसा, आम्ही अपमाना विरोधात लढू – संजय राऊत

11:28 (IST) 17 Dec 2022
महामोर्चामध्ये प्रमुख नेत्यांसाठी ‘D’ सुरक्षा कवच!

मविआच्या महामोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. सर्वात पुढे चालणाऱ्या या नेत्यांसाठी 'डी' सुरक्षा कवच देण्यात येणार आहे.

11:26 (IST) 17 Dec 2022
“महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकारवर घणाघात होणार या भीतीने…”

सरकारवर घणाघात होणार, या भीतीने पाय लटपटू लागले आहेत. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तेरा अटी शर्ती घातल्या गेल्या. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान महाराष्ट्रात होत आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केला.

वाचा सविस्तर

11:25 (IST) 17 Dec 2022
“महामोर्चा निघणारच, आडवे येऊ नका!”, शिवसेनेचा शिंदे सरकारला इशारा; म्हणाले, “महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचे…”

छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान, सीमावती भागाबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली भडकाऊ वक्तव्ये, बेरोजगारी, महागाई याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज ( १७ डिसेंबर ) ‘हल्ला बोल’ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावरून शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून केंद्रातील मोदी सरकार आणि शिंदे सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत.

वाचा सविस्तर

11:24 (IST) 17 Dec 2022
यांना लोकशाहीच मान्य नसेल तर काय करणार – जितेंद्र आव्हाड

सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाची जागा अतिक्रमित करायची नसते हा लोकशाहीचा संकेत आहे. पण यांना लोकशाहीच मान्य नसेल तर काय करणार? – जितेंद्र आव्हाड

11:24 (IST) 17 Dec 2022
महाविकास आघाडीचा मुंबईत ‘महामोर्चा’; कुठून निघणार मोर्चा, कुठे होणार सभा, कोण होणार सहभागी? वाचा सविस्तर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करण्यात आला. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान, राज्यातील प्रकल्पांची पळवापळव, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात आज ( १७ डिसेंबर ) महाविकास आघाडीच्या वतीने ‘हल्ला बोल’ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

वाचा सविस्तर

11:23 (IST) 17 Dec 2022
“हिंदुधर्मासाठी गेला मग राज्यपालांच्या वक्तव्यावर…”, रुपाली पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका; मनसेलाही लगावला टोला

छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाच्या नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान, राज्यातील प्रकल्पांची पळवापळव, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात आज ( १७ डिसेंबर ) महाविकास आघाडीच्या वतीने ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आलं. यासंदर्भात रुपाली पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

वाचा सविस्तर

11:15 (IST) 17 Dec 2022
महाविकास आघाडीचा मुंबईत ‘महामोर्चा’; कुठून निघणार मोर्चा, कुठे होणार सभा, कोण होणार सहभागी?

महाविकास आघाडीच्या वतीने ‘हल्ला बोल’ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, भाजपाच्या वतीने ‘माफी मांगो’ आंदोलन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

वाचा सविस्तर

11:14 (IST) 17 Dec 2022
“कुणीही यावं आणि टपली मारून जावं…”, सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल

सुप्रिया सुळे म्हणतात, “महाराष्ट्रातले सत्ताधारी सगळे चुपचाप बसले होते. आम्ही गेलो होतो अमित शाह यांच्याकडे. खरंतर अमित शाह यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी…!”

वाचा सविस्तर

11:14 (IST) 17 Dec 2022
“नागपुरात भाड्याची गर्दी जमणार नसल्यानेच मुंबईत मोर्चा”, राम कदमांची मविआवर खोचक टीका; म्हणाले, “बाळासाहेबांचा मुलगा आज…”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या मोर्च्यावरून भाजपा नेते राम कदम यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केलं आहे. सविस्तर वाचा –

11:14 (IST) 17 Dec 2022
“हसावं की रडावं…”, जितेंद्र आव्हाडांचं महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर खोचक ट्वीट; मुख्यमंत्र्यांना टोला!

शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालांची विधानं आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योग या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले असून या मोर्चातून सरकारचा निषेध केला जाणार आहे. त्यात भाजपाकडूनही मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून ‘माफी मांगो आंदोलन’ केलं जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्वीट करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.

वाचा सविस्तर

मुंबईत मविआचा महामोर्चा (फोटो – लोकसत्ता टीम)